घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरPM Modi : मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत शिंदे गटाचं मोठं वक्तव्य; ...नाहीतर भर चौकात...

PM Modi : मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत शिंदे गटाचं मोठं वक्तव्य; …नाहीतर भर चौकात फाशी

Subscribe

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालात शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला. तर दोन्ही गटातील आमदार अपात्र न ठरवता पात्र ठरविण्यात आले.

हिंगोली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी (10 जानेवारी) जाहीर झाला. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विजय आणि त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत शिंदे गटातील आमदाराने मोठं वक्तव्यं केलं आहे. आमदाराच्या या वक्तव्याने राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. (PM Modi  Shinde groups big statement about Modi’s prime ministership otherwise hanged in Bhar Chowk)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालात शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला. तर दोन्ही गटातील आमदार अपात्र न ठरवता पात्र ठरविण्यात आले. या निकालानंतर शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच निकालाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघात म्हणजेच हिंगोलीत शिवसंकल्प अभियानानिमित्त दौऱ्यावर होते. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होत नाही तोच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाबाबत मोठं वक्यव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान न झाल्यास आपण भर चौकात फासावर लटकू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर Uddhav Thackeray यांच्या अडचणीत वाढ! आता ‘मशाल’ चिन्हही जाणार?

काय म्हणाले आमदार संतोष बांगर?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्यं केलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाला माहिती आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडून द्यायचं आहे. छाती ठोकून सांगतो. 2024 चा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. एप्रिलमध्ये आगामी लोकसभेची निवडणूक आहे. छाती ठोकून सांगतो, 2024 ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भर चौकात फाशी घेईन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील असा दावा आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mukesh Ambani यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Sandeep Deshpande यांचा हल्लाबोल; “सगळा बोऱ्याबिस्तरा गुंडाळा…”

आमदार पात्र आणि शिवसेनाही शिंदेना

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी दिलेल्या निकालात शिंदे गटाचे 16 ही आमदार पात्र ठरविले. तर विधिमंडळातील पक्षीय बलाबलावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा पक्ष शिंदे गटाकडेच दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदार पात्र ठरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -