घरलाईफस्टाईलछोटीशी लवंग 'या' समस्या ठेवते दूर

छोटीशी लवंग ‘या’ समस्या ठेवते दूर

Subscribe

लवंग हा जेवणामध्ये विशेष चव वाढवणारा मसाल्याचा पदार्थ आहे. मात्र हा लवंग तेवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून याचे अनेक आरोग्यादायी फायदे देखील आहेत. नेमके कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेऊया...

लवंग हा मसाल्यातील पदार्थ म्हणून ओळखला जातो. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे

डोके दुखी

डोके दुखत असल्यास लवंगाचे तेल किवा लवंगाचा लेप लावावा. यामुळे डोके दुखी थांबण्यास मदत होते.

- Advertisement -

हिरड्यांना सूज

दात किंवा हिरड्यांना सूज आल्यास लवंग हा त्यावर एक रामबाण उपाय आहे. हिरड्यांना सूज आल्यास लवंग तोंडात धरुन चघळावी.

खोकला

खोकला झालेल्या व्यक्तींने दररोज सकाळ – संध्याकाळ दोन – तीन लवंग चघळल्यास खोकल्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

- Advertisement -

पोटाची समस्या

लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्यावे. यामुळे पोटाची समस्या दूर होण्यास मदत होते.

पिंपल्सपासून सुटका

लवंगाच्या तेलात अॅँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास लवंगाचा लेप चेहऱ्याला लावाल्यामुळे पिंपल्सपासून सुटका होते.

मधुमेहावर लाभदायी

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.

गर्भारव्यस्थेत फायदेशीर

गर्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखे दुसरे औषध नाही. लवंगामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे लवंगाचे सेवन केल्याने फायदा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -