घरमहाराष्ट्रमद्य प्राशनाच्या त्रासातून आईने केली मुलाची हत्या

मद्य प्राशनाच्या त्रासातून आईने केली मुलाची हत्या

Subscribe

उस्मानाबाद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरळणीबाई नावच्या आईने तिच्या मुलाला कुऱ्हाडीचा घाव घालून झोपेतच त्याची हत्या केली. मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

आपण ऐकतो की, गुंड प्रवृत्तीच्या मुलांने मुलीला मारले किंवा मुलाला खुन केला, प्रियकरांनी प्रियसीची हत्या केली. मात्र, उस्मानाबाद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या मुलाला कुऱ्हाडीचा घाव घालून झोपेत हत्या केला आहे. मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क करून घरातील कुलूप तोडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तीन तासामध्ये मुलाची हत्या करणाऱ्या आईला तपास करून अटक केली.

दारूच्या व्यसनातून आईशी वाद

मध्यरात्री दीडच्या सुमारास मृताच्या भावाला किंकाळी ऐकू आली होती. मात्र, हत्या करणाऱ्या आईने त्याला ‘काहि नाही झोप’, असे सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तिने केला. राम महादेव कावळे (३५) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. राम हा व्यावसायाने टेलर होता. तसेच त्याला दारूचे व्यसन सुद्धा होते. त्याची पत्नी आणि दोन मुलांसह काही दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती. राम आणि त्याची आई हिरकणाबाई कावळे हे दोघेच घरात राहत होते. राम दारू पिऊन आईसोबत वाद घालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच हिरकणाबाईने मुलाची हत्या केली अशी कबूली बेंबळी पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

फरार आईला पोलिसांनी केले अटक

दरम्यान, पोलिसांनी घराची तपासणी केली असता. चुली जवळील सरपणात कुऱ्हाड लपविलेली असल्याचे आढणून आले. हिरकणाबाईने मुलाची हत्याकरून रक्तात माकलेली ती कुऱ्हाड पाण्याने धुवून काढली होती. मात्र, त्यावरील काही डाग आढळुन आले. मुलाची हत्याकरून हिरकणाबाई सकाळी ६ वाजता बसने उस्मानाबाद गाठले. ती नातेवाईकांकडे गेली असता. नातेवाईकांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले होते. तिथूनच पोलिसांकडून अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -