घरलाईफस्टाईलबेडशीट खरेदी करताना 'या' चुका करू नका

बेडशीट खरेदी करताना ‘या’ चुका करू नका

Subscribe

अनेकदा आपण आपल्या बेडसाठी नवीन बेडशीट खरेदी करतो. मात्र हे करत असताना काही छोट्या चुका करू नये. ज्यामुळे आपल्याला त्याचा त्रास नंतर त्रास होणार नाही. तसेच बेडशीट आपल्या संपूर्ण बेडरूमचा लुक बदलू शकते. त्यामुळेच बेडशीट खरेदी करताना रूमची साईज बेडची डिझाईन लक्षात घेऊनच मग बेडशीट घ्याव्यात. जेणेकरून चुकीच्या बेडशीट घेतल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या बेडवर होणार नाही. आणि त्यामुळे तुमचा रूम खराब दिसणार नाही.

आजकाल, बेडशीटच्या रंगापासून ते पॅटर्न आणि स्टाइल इत्यादीपर्यंत अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे हे घेताना आपण अनेकदा विचारात पडतो कि कोणती घ्यावी. सहसा, आपण बेडशीटचा रंग किंवा त्याची प्रिंट पाहतो आणि आपल्याला ते आवडत असल्यास, आपण विचार न करता ती बेडशीट खरेदी करतो. पण आवडलेली बेडशीट खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. बेडशीट खरेदी करताना काही चुका झाल्या तर आपल्याला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला बेडशीट खरेदीशी संबंधित काही चुका सांगत आहोत, ज्या तुम्ही खरोखर टाळल्या पाहिजेत.

- Advertisement -

How to choose a perfect bed sheet online - Quora

फॅब्रिककडे लक्ष द्या

अनेकदा आपण फक्त त्याची प्रिंट किंवा रंग पाहून बेडशीट खरेदी करतो. पण त्याच्या फॅब्रिकवर लक्ष देत नाही. आजकाल बाजारात कॉटनपासून सिल्क आणि लोकरीपर्यंत अनेक फॅब्रिक्सच्या बेडशीट उपलब्ध आहेत. त्यामुळे हवामान आणि तुमच्या गरजा लक्षात घेऊन फॅब्रिकची निवड करावी.

बेडच्या आकाराकडे दुर्लक्ष करू नका

- Advertisement -

बेडशीट खरेदी करताना बरेच जण एक चूक करतात. ती म्हणजे सिंगल आणि डबल बेडचा आकार जवळपास सारखाच असतो. पण बेडशीट जेव्हा आपण मापून घेत नाही तेव्हा सिंगल बेड किंवा डबल बेड याच्यावर परिणाम होऊ शकतो. कारण कधी कधी बेडशीटची साईज आपल्या बेडवर योग्य प्रकारे बसत नाही. तर ती बेडशीट लहान मोठी होती. आणि आपण जेव्हा ती बेडवर घालतो तेव्हा ती नीट बसत नाही.

नेहमी स्वस्त पण चांगली बेडशीट निवडा

बेडशीट खरेदी करताना त्या बेडशीटचा दर्जा चांगला आहे का ? हे सर्वात अद्धि बघून घ्या. कारण आपल्याला वाटते स्वस्त बेडशीट मिळतेय तर घेऊया. पण तसं करू नका. बेडशीटच्या फ्रॅबिककडे लक्ष द्या. टिकाऊ आणि कॉटन बेडशीट निवडा. यामुळे गरम होत नाही. आणि कॉटन बेडशीट बेडवर चांगली बसते.

हवामानाकडे दुर्लक्ष करू नका

बेडशीट विकत घेताना हवामानाकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळयात बेडशीट ही कॉटनची असावी. हिवाळ्यात मिक्स फॅब्रिक असेलेली बेडशीट निवडा. कारण ही बेडशीट सुकते पण लवकर आणि झोपण्यासाठी अश्या बेडशीट खूप चांगल्या आहेत.


हेही वाचा : कॉटन शर्टला झटपट अशी करा इस्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -