घरलाईफस्टाईलपालक खाण्याचे लाभदायक फायदे

पालक खाण्याचे लाभदायक फायदे

Subscribe

पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पालेभाज्यात मोठ्या प्रमाणात सत्व असतात. मात्र, पालेभाजी म्हटलं का अनेक जण तोंड मूरडतात. मात्र, हीच पालेभाजी आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. त्यामुळे डॉक्टर नेहमी पालेभाजी खाण्याचा सल्ला देतात. कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असतात. त्यातील पालक या भाजीत ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पालेभाजीचे सेवन करावे.

हिमोग्लोबिन वाढते

पालकामध्ये मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन वाढवण्याचे घटक असतात. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्त कमी आहे, अशा व्यक्तींनी पालकाचे सेवन करावे.

- Advertisement -

स्मरणशक्ती वाढते

पालकामध्ये असलेल्या कॅल्शियमने वाढीच्या वयातील मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी पालक लाभदायक ठरते. यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते.

उष्णता कमी होते

अनेकांची प्रकृती उष्ण असते. या उष्ण प्रकृतिचा अनेकांना फार त्रासही होतो. त्यांना उष्ण पदार्थ वर्ज केले जातात. त्यासाठी पालक ही फार उपायकारक आहे. पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.

- Advertisement -

मधूमेहावर उपयुक्त

मधूमेहाच्या रुग्णांनी पालकाचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. कारण पालकामध्ये व्हिटॅमिन, मिनरल आणि अल्फा लिपोइक Acid पालकमध्ये आढळते. यामुळे शरिरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

सुरकुत्या कमी होतात

जसे उन्हाळ्यात पालकाचे सेवन केल्याने फायदा होतो. तसेच हिवाळ्यात देखील ताजी पालक खाणे खूप चांगली असते. हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी पडत असते. पालक ही त्वचा कोरडी होण्यापासून वाचवते. त्याचबरोबर सुरकुत्या कमी करते आणि केसगळतीही कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -