घरलाईफस्टाईलHealth Tips : उन्हाळ्यात या ६ आजारांचा असतो सर्वाधिक धोका

Health Tips : उन्हाळ्यात या ६ आजारांचा असतो सर्वाधिक धोका

Subscribe

उन्हाळ्यातील कडक ऊन आणि शरीराला येणारा घाम यांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

प्रत्येक ऋतूमध्ये अनेकांना कोणता ना कोणता आजार होतचं असतो. त्याप्रमाणेच उन्हाळ्यातही अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे लागत. याचं कारण म्हणजे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि शरीराला येणारा घाम यांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

- Advertisement -

१. उष्माघात
उन्हाळ्यात दिवसभर उन्हात जास्त फिरल्यामुळे तुम्हाला उष्माघातच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये तुम्हाला शरीरात कमजोरी, डोके दुखी, ज्वर, अपचन या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

२. डिहायड्रेशन
अनेकजणांना कमी पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन सारख्या समस्यांना सामोरं जाव लागू शकतं. डिहायड्रेशनमुळे त्यांना कोणताही त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे, तसेच दिवसातून एकदा ग्लूकोजचे पाणी प्यावे.

- Advertisement -

३.फूड पॉइजनिंग
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे जेवण लवकर खराब होते. अशावेळी रात्रीचे जेवण सकाळी खाऊ नये, आणि सकाळचे जेवण रात्री खाऊ नये. नाहीतर फूड पॉइजनिंगचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

४.सनबर्न
उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे सनबर्नचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्वचा लालसर पडू शकते. त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्याआधी सन स्क्रिमचा वापर करा.

५.टायफाइड
उन्हाळ्यात तुम्हाला टायफाइड सारखे आजार देखील होऊ शकतात. टायफाइडमुळे जास्त ताप येणे, भुक न लागणे, पोट दुखी यांसारखे त्रास होतात.

६.मायग्रेन
उन्हाळ्यातील गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास तुम्हाला अधिक प्रमाणात होऊ शकतो. खरंतर गरमीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास तुम्हाला होतो.

 

 

हेही वाचा :Summer Tips-हॉट उन्हात घ्या कूल कूल कलिंगड आणि कोकम स्मूदीचा स्वाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -