घरताज्या घडामोडीSummer Tips-हॉट उन्हात घ्या कूल कूल कलिंगड आणि कोकम स्मूदीचा स्वाद

Summer Tips-हॉट उन्हात घ्या कूल कूल कलिंगड आणि कोकम स्मूदीचा स्वाद

Subscribe

उन्हाळा सुरू झाला असून यावर्षी उष्माही रेकॉर्डब्रेक वाढला आहे. यामुळे दिवसाच नाही तर

रात्रीही अंगाची काहीली काहीली होत आहे. साहजिकच एवढ्या उष्म्यात घामाद्वारे शरीरातील पाणीही कमी होते. यामुळे या दिवसात कलिंगड आणि कोकम यासारखे शरीराला थंडावा देणारे आणि डिहायड्रेड ठेवणाऱ्या फळांचा, पेयांचा वापर करावा. त्यातही कलिंगडात लायकोपिन नावाचे घटक असतो ज्यामुळे त्वचा तजेलदार दिसते. तसेच इतर फळांच्या तुलनेत कलिंगडात पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेड ठेवण्यासाठीही कलिंगड आणि कोकम सरबत पिणे फायदेशीर असते.

- Advertisement -

साहीत्य- २०० ग्र२म कलिंगडाच्या फोडी, १०० ग्रॅ ताजे कोकम, १० ग्रॅम पुदीन्याची पाने, २ मीली जैतूनचे तेल, ९० ग्रॅम काकडी(तुकडे), ३० ग्रॅम लाल सिमला मिरची, ३ लिंबू , चवीप्रमाणे मीठ.

कृती- सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कलिंगडाच्या फोडी करून घ्याव्या. त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये पुदीना,कोकम, तेल, काकडी, सिमला मिरची हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे. नंतर हे मिश्रण तासभर किंवा जमल्यास रात्रभर तसेच फ्रिजमध्ये ठेवावे. त्यानंतर कलिंगडच्या फोडी आणि इतर जिन्नस मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याची प्युरी करावी. गाळून पिण्यास द्यावे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -