घरलाईफस्टाईलजिममध्ये जाण्यापूर्वी 'या' गोष्टींचे सेवन टाळा!

जिममध्ये जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा!

Subscribe

जिममध्ये जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे?

बऱ्याच जणांच्या तोंडून वजन वाढल्याचे बोले जाते आणि हेच वजन हटवण्यासाठी देखील अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात येतात. तर काही जण झटपट वजन कमी करण्यासाठी जिम देखील लावतात. मात्र, या जिमसोबत पुरेसा आराम देखील तेवढाचा महत्त्वाचा असतो. परंतु, अनेक व्यक्ती जिम लावतात आणि त्यांना जिमपूर्वी काय खावे? काय खाऊ नये? याबाबत काहीच माहित नसते आणि त्याचा शरिरावर परिणाम होतो. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत की, जिमला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे.

निकोटीन ड्रिंक्स

- Advertisement -

एखादी व्यक्ती जर निकोटीनचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तींने जिमला जाण्यापूर्वी कॅफीन आणि निकोटीनचे सेवन करु नये. कॅफीन आणि निकोटीन शरिरातील ब्लड फ्लोची प्रक्रिया कमी करतात. जेव्हा तुम्ही जिममध्ये वर्कआऊटकरता त्यावेळी ऑक्सिजन सप्लाय बॅलेन्स करण्याकरता जोरात पंप करणे गरजेचे असते. ज्यामुळे हृदयावर दबाव निर्माण होतो आणि याचा शरिरावर परिणाम होतो.

- Advertisement -

 

फ्रूट ड्रिंक्स

बरेच जण वर्कआऊटच्यावेळी गोड फ्रूट ड्रिंक्सचे सेवन करतात. या ड्रिंक्समध्ये अनेक प्रकारची साखर आणि इतर द्रव्य असतात. जे शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी गोड फ्रूट ड्रिंक्सचे सेवन करु नये. त्याऐवजी तुम्ही घरी तयार केलेल्या ड्रिंक्सचे सेवन करा. अथवा एखादे फळ खा. यामुळे चांगला फायदा होण्यास मदत होते.

 

कार्बोनेटेड ड्रिंक्स

अल्कोहलसारख्या कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये सर्वाधिक साखर आणि दुसरे असे पदार्थ जे शरीराला घातक असतात. यामुळे तुमचे नुकसना होऊ शकते. वर्कआऊटच्या अगोदर कार्बोनेटेड ड्रिंक्ससारख्या गोष्टी प्यायल्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि डिहायड्रेन सारख्या समस्या उद्भवतात.

स्पोर्ट्स ड्रिंक

जिममध्ये जाण्यापूर्वी अनेक मुलं स्पोर्ट्स ड्रिंकचे सेवन करतात. यामध्ये देखील साखरेचे प्रमाण देखील सर्वाधिक असते. याचा परिणाम तुमच्या मेटाबायोलॉजीवर होऊ शकतो. त्यामुळे स्पोर्टस ड्रिंक टाळा आणि घरगुती ज्यूसचे सेवन करा.

 

अल्कोहोल

अल्कोहोल प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे तुमच्या शरीरातील ऍनर्जी देखील नष्ट होते. जिममध्ये वर्कआऊट केल्यामुळे घाम निघतो यावेळी भरपूर एनर्जीची गरज असते. त्यामुळे जिममध्ये जाण्याअगोदर अल्कोहोल टाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -