घरलाईफस्टाईलहेल्दी ड्रिंक - भाताची पेज

हेल्दी ड्रिंक – भाताची पेज

Subscribe

आजारी असताना पचनास हलके जावे, तसेच ताजेतवाने वाटावे म्हणून आई आपल्याला पेज प्यावयास देते. मात्र, आजारपणा व्यतिरिक्तही नियमित पेज सेवनाचे आरोग्यदायी लाभ आपल्याला मिळतात. पेज बनविण्यास सोपी असून, हेल्दी ड्रिंक म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता.

शरीराला ऊर्जा मिळते, भूक वाढते – भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. या कार्बोहायड्रेट्सचे विघटन करून तुम्हाला तत्काळ ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामुळे घरातून निघण्यापूर्वी पेजेचे पाणी पिऊन निघा. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने रहाल, तसेच तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो, तसेच पेजेमध्ये काळे मीठ टाकून प्यायल्याने भूक वाढते.

- Advertisement -

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो – यामधील फायबर घटक मलविसर्जनाची क्रिया सुकर करते, तसेच स्टार्च उपयुक्त बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत करते. परिणामी पोट साफ राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तांदळाच्या पेजेमध्ये लिंबाचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. दही टाकून तांदळाची पेज प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तांदळाच्या पेजेमध्ये मीठ आणि जिरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते.

डीहायड्रेशनचा धोका टळतो – कडक उन्हाळ्यात अनेकदा शरीरातील पाण्याचा अंश कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी पेजेचे पाणी पिणे उत्तम हेल्थ ड्रिंक आहे. घामामुळे शरीरातून मीठाचे प्रमाण कमी होते त्यामुळे पेजेचे पाणी घटणारी पोषणद्रव्य वाढवण्यास मदत करतात. तांदळाच्या पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने शरीरातून पाण्याची कमतरता दूर होते. पेजेमुळे शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.

- Advertisement -

व्हायरल इंफेक्शनपासून बचाव होतो – व्हायरल इंफेक्शनमुळे तापाच्या किंवा उलट्यांच्या त्रासाने कमजोरी आल्यास जेवणाऐवजी पेज प्या. यामुळे आजारपण दूर करण्यास तसेच शरीरातील पोषणद्रव्यांची झीज भरून काढण्यास मदत होते.

डायरियाचा त्रास कमी होतो – आबालवृद्धांमध्ये डायरियाच्या समस्येवर मात करण्याचा उत्तम घरगुती उपाय म्हणजे ‘भाताची पेज’. लहान मुलांमध्ये डायरियाच्या समस्येवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे रूपांतर गंभीर स्वरूपातील डीहायड्रेशनमध्ये होते.भाताची पेज डायरियाच्या समस्येवर उत्तमरित्या मात करू शकते. केळे आणि तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने डायरियापासून आराम मिळतो.

कशी बनवाल पेज

कपभर पेजेचे लाल तांदूळ (उपलब्ध नसल्यास साधे तांदूळ) 3-4 कप पाण्यात उकळा. अर्धे कच्चे शिजल्यानंतर त्याचे पाणी गाळून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घालून गरमगरम प्या किंवा अगदी मऊ शिजवलेला पेजेचा भात त्या पाण्यासोबतच खा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -