घरलोकसभा २०१९काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करतेय

काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करतेय

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सामील होण्यासंदर्भात लेखी प्रस्ताव दिला होता. आंबेडकरांनी या प्रस्तावावर आता चार पानी पत्राद्वारे उत्तर देत काँग्रेसच्या महाआघाडीच्या हेतूवरच संशय व्यक्त केला. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा प्रस्ताव मांडला, मात्र त्यामागील हेतू संशयास्पद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावर काँग्रेसने अद्याप उत्तर दिले नाही, यावरून काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी या पत्रातून केला.

आपण जुलैपासून काँग्रेसकडे आघाडीसंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. मात्र काँग्रेसने आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष केले. अखेरीस वंचित बहुजन आघाडीला एमआयएमने पाठिंबा दिल्यावर काँग्रेस घाबरली आणि त्यांनी आम्हाला युतीसाठी प्रस्ताव पाठवला. मात्र त्यावेळी एमआयएमला विरोध केला. सेना-भाजपला हरवायचे असेल तर कुटुंबशाहीची सत्ता न राहता धनगर, माळी, साळी, वंजारी, मुस्लीम, ओबीसी यांचा उमेदवारीच्या यादी समावेश झाला पाहिजे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी १२ जागा मागत आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवारी तीन लोकसभा निवडणुकांत हरले, त्या ह्या १२ जागा आहेत. त्यावर आपण हायकमांडशी बोलून घेऊ म्हणालात, मात्र अद्याप निर्णय कळवला नाही, उलट २ पेक्षा अधिक जागा देणार नाही, अशी आपली भूमिका प्रसारमाध्यमांमधून वाचायला मिळाली. आपली भूमिका जागांसंदर्भात नसून तात्विक मुद्द्यांवर असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसप्रणीत महागठबंधनमधील घटक पक्षांतील विधीतज्ज्ञ नेत्यांची समिती गठीत करण्याची मागणी आंबेडकरांनी पत्राच्या शेवटी केली आहे. या पत्रावर काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहत असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे. आंबेडकरांच्या या पत्राला काँग्रेस काय उत्तर याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -