घरलाईफस्टाईलब्लॅक हेड्स घालवण्याचे घरगुती सोपे उपाय

ब्लॅक हेड्स घालवण्याचे घरगुती सोपे उपाय

Subscribe

हळद-

हळद आणि पुदिन्याचा रस एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करा आणि त्याने पाच मिनिटे चेहर्‍याची मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

- Advertisement -

बेसन –

एक चमचा बेसनात 2 चमचे दूध आणि चिमूटभर मीठ मिसळून पेस्ट बनवा आणि या पेस्टने ब्लॅक हेड्सवर मसाज करा.10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

- Advertisement -

दालचिनी-

एक चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि हळद मिसळा. याने चेहर्‍याची मसाज करा. पाच मिनिटांनी धुवून टाका.

मध-

एक चमचा मध ब्लॅक हेड्सवर लावून 5 मिनिटे मसाज करा. नंतर ते सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

दही –

अर्धा चमचा दह्यात थोडी मिरेपूड टाकून मिसळून घ्या. हे ब्लॅकहेड्सवर लावून मसाज करा.10 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

बेकींग सोडा-

अर्धा कप पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि ब्लॅकहेड्सवर थोडा वेळ लावून ठेवा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

गुलाबजल-

एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा मीठ मिसळून चेहर्‍यावरील ब्लॅकहेड्सवर मसाज करा. १0 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

साखर-

एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर एकत्र करुन, त्याने ब्लॅकहेड्सवर मसाज करा. 5-10 मिनिटांनी ओल्या कॉटनने चेहरा स्वच्छ करा.

लिंबू-

लिंबूचा रस ब्लॅकहेड्सवर लावून मसाज करा. 2 मिनिटांनी यावर मीठ लावून मसाज करा आणि स्वच्छ धुवून घ्या.

केळीची साल-

केळीच्या सालीचा आतील भाग ब्लॅकहेड्सवर लावून मसाज करा.10 मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -