संपूर्ण जग श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन होताना आपल्याला नेहमीची पाहायला मिळत. अशातच केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक लोक श्री कृष्णाच्या दर्शनासाठी वृंदावन मथुरेत येतात. तसेच अनेक भक्तजन श्री कृष्णाच्या सजावटीसाठी कधी मागे पडत नाहीत. मग ते कृष्णाच्या कपड्यांबद्दल असो किंवा दागिन्यांबद्दल. तसेच लोक कृष्णसाठी सुंदर दागिने आणि कपडे विकत आणतात आणि या कृष्ण बाळाला छानपैकी सजवतात.
यंदा श्री कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबर 2023ला असून अनेक मंडळी आता श्री कृष्णच्या जन्म दिवसाच्या तयारीला लागले आहेत. अशातच तुम्ही देखील घरात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार असाल तर यावर्षी कृष्ण बाळासाठी जुन्या टोपल्यांपासून घरी बनवा सुंदरसा पाळणा.
अशाप्रकारे सजवा श्री कृष्णासाठी पाळणा
- Advertisement -
- तुम्ही घरात ठेवलेली प्लास्टिक किंवा लाकडी टोपली सुंदर प्रकारे सजवू शकता.
- टोपली सजवण्यासाठी बाजारातून लोकरीचे रंगीबेरंगी धागे, मखमली कापड, दगड, मोती, रत्ने आणि इतर सजावटीच्या वस्तू आणा.
- आता या गोष्टी एकत्र करा आणि टोपली सजवायाला सुरुवात करा.
- तसेच सुंदर रंगीबेरंगी लोकरी धागा घ्या आणि त्यातून पोम पोम्स आणि पेंडेंट बनवा.
- आता त्यांचे रंगीबेरंगी धागे एका मोठ्या सुईमध्ये थ्रेड करा आणि टोपलीच्या छिद्रांमध्ये लाईनने घाला आणि मग लोकरीच्या धाग्यांनी सर्व छिद्रे बंद करा.
- आता बास्केट हॅन्गर बनवा.
- त्यासाठी बाजारातून जाडशी अशी अॅल्युमिनिअम वायर घेऊन या.
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोपली टांगल्या शिवाय विशिष्ट ठिकाणी बांधून देखील ही टोपली झुलवू शकता.
- आता बास्केटमध्ये विविध ठिकाणी रंगीबेरंगी लोकरीचे पोम पोम आणि टॅसल चिकटवा.
- यामुळे तुम्हाला बास्केटला एक स्विंग मिळेल.
- अशाप्रकारे बास्केटला स्विंग लावण्यासाठी तुम्ही कोणतेही कापड किंवा स्टायलिश रशी देखील लावू शकता.
हेही वाचा : परफ्यूमच्या रिकाम्या बाटलीचा ‘असा’ करा उपयोग
- Advertisement -
- Advertisement -