घरलाईफस्टाईलजुन्या कपड्यांपासून अशा पद्धतीने बनवा लंच बॅग

जुन्या कपड्यांपासून अशा पद्धतीने बनवा लंच बॅग

Subscribe

वापरलेली कोणतीही वस्तू जुनी होत नाही. फक्त ती पुन्हा वापरण्याची ट्रिक आपल्याला माहित असायला हवी. विशेषतः कपड्यांचे बोलायला गेल्यास ते वापरून कंटाळा येईल पण ते खराब होत नाहीत.  शर्ट- जीन्स असो किंवा टी शर्ट आणि सूट, ते अनेकवेळा घातल्यानंतर एक वेळ अशी अशी येते की ते घालून आपल्याला कंटाळा येतो. अशा वेळी जुन्या कपड्यांचे काय करायचे असा प्रश्न अनेक जणींना पडतो. आज आपण याच जुन्या कपड्यांपासून ऑफिससाठी लंच बॅग कशी बनवता येईल ते पाहुयात, 

small canvas lunch bag for Sale,Up To OFF 62%

1) ऑफिस लंच बॅग बनविण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जुने कपडे घ्यायचे आहेत. त्यानंतर हे कपडे तुम्हाला चौकोनी आकारात कापून घ्यायचे आहेत. 

2) यानंतर या कपड्यांना पिशवीच्या आकारात दुमडून घ्या.

3) चांगल्या प्रकारे ती बॅग स्टिच करून घ्या. 

4) आता तुमची बॅग तयार झालेली तुम्हाला दिसेल. 

5) बॅगेला हॅन्डल बनविण्यासाठी तुमच्या आवडीच्या रंगाचे किंवा बॅगेच्या विरोधी रंगाचे कपडे घ्या. 

6) हा कपडा रश्शी सारख्या आकारात गुंडाळून घेऊन तो बॅगेसोबत स्टिच करून घ्या. 

7) हवी असल्यास तुम्ही बॅगेला एक छानशी लेस सुद्धा लावू शकता. याने तुमच्या बॅगेची शोभा वाढेल. 

8) तसेच तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बॅगेला झिप सुद्धा लावू शकता. 

9) याशिवाय जर तुम्हाला बॅगेत एक छोटा कप्पा हवा असल्यास तो करण्यासाठी तुम्हाला खिशाच्या आकारात एक तुकडा कापून तो बॅगेसोबत स्टिच करायचा आहे. 

बॅग बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा, 

  • जुने कपडे वापरताना ते कपडे जीर्ण अथवा फाटलेले नाहीत ना याची खात्री करून घ्या. 
  • घट्ट स्टिच करा जेणेकरून वजनाने बॅग तुटणार नाही. 
  • तुम्ही २- ३ रंगाचे कपडे वापरणार असला तर कॉन्ट्रास्टची काळजी घ्या. 
  • बॅग बनवताना नवीन झिपचा वापर करा.                     

 

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -