घरपालघरपाणी प्रश्नावर श्रमजीवी रस्त्यावर

पाणी प्रश्नावर श्रमजीवी रस्त्यावर

Subscribe

त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असून १५ व्या वित्त आयोग व पेसा मधून ही पाणी पुरवठासाठी खर्च होणार आहे.

वाडा:  पालघर जिल्ह्यात पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून पालघर जिल्ह्यात तब्बल १८ ग्रामपंचायतींवर धडक मोर्चे आयोजित करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी आज अधिकार्‍यांना जाब विचारत आमच्या घरात झोपडीत नळाचे स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी येणार याबाबत लेखी आश्वासन घेतले. ४ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणार्‍या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत, झापात नळाने पाणी पुरवठा मिळालेच पाहिजे अशी योजना आहे.

त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असून १५ व्या वित्त आयोग व पेसा मधून ही पाणी पुरवठासाठी खर्च होणार आहे. प्रत्येक गावात २ कोटी रुपयांपासून १० कोटी पर्यंतचा निधी आलेला आहे. मात्र या योजना आजपर्यंत पूर्णत्वास नाहीत. मूळ ठेकेदार फक्त कागदावर असून प्रत्यक्षभलतेच ठेकेदार हे काम करत असून अत्यंत निर्कृष्ट दर्जाने हे काम सुरू आहे. याबाबत गेले अनेक दिवस गावागावात जाऊन जनजागृती करण्याचे काम श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करत होते. आजपासून १० तारखेपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संघटनेने पाण्याच्या प्रश्नावर एक चळवळ सुरू केली आहे. या हंडा मोर्चाचे नेतृत्व त्या त्या भागातील श्रमजीवी संघटनेचे गाव विभाग स्तरावरील गावकमेटी तसेच झोन कमिटी प्रमुखांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -