घरताज्या घडामोडीBMC : मुंबई महापालिकेकडून 15 दिवसांत 16.51 टक्के नालेसफाई; मिठी नदीतून 48.58...

BMC : मुंबई महापालिकेकडून 15 दिवसांत 16.51 टक्के नालेसफाई; मिठी नदीतून 48.58 टक्के गाळ बाहेर

Subscribe

मुंबईत कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र मुंबई महापालिकेने येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होवू नये यासाठी मिठी नदी, लहान व मोठे नाले यांच्या सफाई कामाला १८ मार्चपासून सुरुवात केली आहे. १ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १५ दिवसात महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे.

मुंबई : मुंबईत कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र मुंबई महापालिकेने येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होवू नये यासाठी मिठी नदी, लहान व मोठे नाले यांच्या सफाई कामाला १८ मार्चपासून सुरुवात केली आहे. १ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १५ दिवसात महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. आतापर्यंत शहर व उपनगरे येथील लहान – मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मे.टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून त्यापैकी १,६८,६७४.७७ मे.टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. (BMC 16 51 percent drainage in 15 days 48 58 percent silt out of Mithi river)

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्या दिवशी मुंबईत एका दिवसात तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता. तसेच, त्याचवेळी समुद्राला मोठी भरती होती. त्यातच कंत्राटदारांनी पालिकेला चुना लावत नालेसफाईच्या कामात ‘हात की सफाई’ दाखवली होती. त्यामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तीय हानी झाली होती. तेव्हापासून केंद्र, राज्य शासन व महापालिका प्रशासन अलर्ट झाले. आता नालेसफाई कामगार जास्त लक्ष दिले जात आहे. विशेषतः २६ जुलैच्या पुरस्थितीला कारणीभूत असलेल्या काही बाबींपैकी एक म्हणजे मिठी नदीच्या सफाई कामावरही जास्त लक्ष दिले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai News : आला उन्हाळा मुंबईकरांनो तब्येत सांभाळा; महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज

महापालिकेने मुंबईतील मिठी नदी, लहान-मोठे नाले, हायवे लगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे कंत्राट काम ३१ कंत्राटदारांना सोपवले आहे. गतवर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. मात्र यंदा १८ मार्चपासून नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाई कामे उशिराने सुरू झाली असून ती कामे पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर अशी तीन टप्प्यात करणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

आतापर्यंत १५ दिवसांत १६.५१ टक्के नालेसफाई

मुंबईत ३१ मे पूर्वी नद्या, नाल्यांमधून एकूण १०,२१,७८१.९२ मे.टन इतका गाळ काढणे अपेक्षत आहे. १८ मार्च ते १ एप्रिल या १५ दिवसांत कंत्राटदारांनी १,६८,६८४.७७ मे. टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. शहर भागात नालेसफाई कामाच्या अंतर्गत ३०,९३९.९४ मे.टन. इतका गाळ काढणे अपेक्षित असून गेल्या १५ दिवसांत त्यापैकी १,७५०.१४ मे.टन (५.६३ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. तर, पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १५,७९०.७८ मे.टन (१२.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

तसेच, पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी ३०,४२९.१२ मे.टन (१२.९४ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. मिठी नदी पात्रातून पावसाळ्यापूर्वी २,१६,१७४.६९ मे.टन इतका गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १,०५,०१४.७३ (४८.५८ टक्के) गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, लहान नाल्यांमधून ३,६३,५३३.२८ मे.टन इतका गाळ काढणे अपेक्षित आहे. आतापर्यंत त्यापैकी १२,०२१.७० मे.टन इतका (३.३० टक्के) गाळ काढण्यात आला आहे. तसेच, हायवे लगतच्या नाल्यांमधून ५२,५६०.०२ मे.टन इतका गाळ काढणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत ३,६६८.३० मे. टन इतका (६.९८ टक्के) गाळ काढण्यात आला आहे.


हेही वाचा – BMC : मुंबईसह नाशिक मनपामध्ये कारकीर्द गाजविणारे रमेश पवार सेवानिवृत्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -