घरदेश-विदेश'दुसरा गोडसे देशाला परवडणार नाही'; हिंदू महासंघाच्या अध्यक्षांचा राहुल गांधींना इशारा?

‘दुसरा गोडसे देशाला परवडणार नाही’; हिंदू महासंघाच्या अध्यक्षांचा राहुल गांधींना इशारा?

Subscribe

हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राहुल गांधी करत असलेल्या विधानामुळे दुसरा गो़डसे निर्माण होऊ नये, असा थेट इशाराच दिला आहे.

काॅंग्रेस पक्षाचे नेते निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राहुल गांधी करत असलेल्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये, असा थेट इशाराच दिला आहे.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, इंदिरा गांधींचा इतिहास वाचला असता तरी सावकरांबद्दल अशी मुर्खपणाची वक्तव्ये केली नसती, असे म्हटले आहे. गेली अनेक वर्ष राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करुन त्यांना बदनाम करण्याचा एककल्ली कार्यक्रम राबवत आहेत. वीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्ये केली की प्रसिद्दी मिळते हे कळण्याइतका सुज्ञपणा राहुल गांधींमध्ये आलेला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अर्धा तास जी बडबड केली त्यातला हायलाइट झाला तो मुद्दा म्हणजे त्यांनी सावरकरांबद्दल केलेले विधान. आजपर्यंत आम्ही सुद्धा प्रतिष्ठा मानसन्मान ठेवून होतो. गांधींबद्दल पण आज तुमच्या माध्यमातून सांगायचे आहे, प्रत्येकवेळेस सावरकरांना टार्गेट करणार असाल तर आम्ही पण महात्मा गांधींची 100 पापं, फाळणीचा इतिहा, हिंदूंचा झालेला नरसंहार सगळ्याचा इतिहास काढण्यात येईल. पुस्तके छापली जातील, आम्ही ती पुस्तके छापली आहेत. राहुल गांधींनी इंदिरा गांधींचा जरी इतिहास अभ्यासला असता तर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिलेली देणगी, त्यांनी केलेला सावरकरांचा उल्लेख,भारतमातेचा सुपुत्र, मोहनदास गांधी यांनी सावरकरांच्या बंधूंना एक पत्र लिहिलेले होते. सावरकरांचा लढा हा पूर्णपणे राजकीय असून मोहनदास गांधी पूर्णपणे खंबीरपणे सावरकरांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी जर याचा अभ्यास केला असता, तर अशी मुर्खपणाची वक्तव्ये केली नसती, असे दवे म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा अरे कुठे आहे गतिमान महाराष्ट्र; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला )

राहुल गांधींनी काही काळ तुरुंगात घालवावा

सावरकर अंदमानमध्ये जिथे राहिले होते तिथली तिकीटे त्यांना पाठवली आहेत. आम्ही आमच्या खर्चाने त्यांची येण्याजाण्याची, राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी दिवसातील काही तास तरी त्या कोठडीत काढावेत. त्यांना सावरकर कळतील. त्यांनी सावरकर वाचण्याची, अभ्यासण्याची अपेक्षाच नाही. सावरकर अनुभवावेत नाहीतर हिंदू महासंघ अधिक आक्रमक होईल. या देशाला दुसरा गोडसे परवडणारा नाही,याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे म्हणत महासंघाने राहुल गांधी यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -