घरलाईफस्टाईलबार्बी लूकसाठी सर्जरी करणं पडलं महाग...

बार्बी लूकसाठी सर्जरी करणं पडलं महाग…

Subscribe

सध्या हॉलिवूड मधील सिनेमा बार्बीचा बोलबाला सुरु आहे. अशातच बार्बी खुप जणांना आवडते. त्यापैकीच एक असलेल्या इंग्लंडच्या हर्टफोर्डशायर येथे राहणाऱ्या ओली लंदन याचा सुद्धा समावेश आहे. त्याने आपण बार्बी सारखे दिसावे म्हणून कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी तब्बल 2.33 लाख पाउंड म्हणजेच 2.46 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र त्याला आता या सर्जरीमुळे पश्चाताप होत आहे.

रिपोर्ट्सनुसार 33 वर्षीय ओली हा ट्रांसजेंडर आहे. त्यामुळे त्याने आपण बार्बी सारखे दिसावे म्हणून 32 सर्जरी केल्या. यासाठी त्याने करोडो रुपये ही खर्च केले. त्याने कॅट आय सर्जरी सुद्धा केली. या सर्जरीमुळे तो पूर्णपणे बार्बी सारखा दिसण्याऐवजी नर बार्बी केन प्रमाणे दिसू लागला आहे. त्याच्या या चुकीच्या निर्णयामुळे त्याला आता पुन्हा पुरुषांसारखे दिसायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Oli London (@londonoli)

- Advertisement -

ओली असे म्हणतो की, माझा चेहरा ऐवढा बदलला गेला आहे चेहऱ्यासंबंधित समस्या उद्भवत आहे. जांभई देताना सुद्धा त्रास होतो आणि चेहऱ्याचा आकारच बदलला जातो. यामुळे फार त्रास होतो. त्याने असे ही म्हटले की, केन चा लूक आणि कॅट आयमुळे आनंदित आहे. मात्र आपल्या निर्णयावर त्याला पश्चाताप जरुर होतोय. याच कारणास्तव त्याला आता बार्बी ऐवजी पुरुषासारखे दिसायचे आहे.

- Advertisement -

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ओलीची प्रेयसी आलिया हिने सुद्धा बार्बी सारखे दिसण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. ओली आणि आलियाने गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बार्बीच्या रुपात एन्ट्री केली होती.


हेही वाचा- ‘हे’ outfits देतील तुम्हाला ‘बार्बी’ लूक….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -