घरलाईफस्टाईलतुमचंही सारखं तोंड येतं ? मग वाचा उपाय

तुमचंही सारखं तोंड येतं ? मग वाचा उपाय

Subscribe

अनेकवेळा चुकीचे काही पदार्थ खाण्यात आल्याने फक्त खाणं पिणंच नाही तर पाणी पिणंही कठीण होतं. चुकीच्या आहारामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता तोंड येणे यासारख्या व्याधी मागे लागतात. काहीवेळा तर जिभेवर फोड येतात, जिभेवर अल्सर होतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे वांधे तर होतातच पण तोंड उघडतानाही अनेकवेळा त्रास होतो. हे सगळे हर्पीस सिम्पलेक्स या आजारामुळे होतो. यात बरेचदिवस तोंड येत. तोंड अनेक दिवस भाजतं राहातं.

यावर उपाय म्हणून अनेकवेळा लोक विविध औषधांचा वापर करतात. पण घरगुती उपाय केल्यावर लवकर आराम मिळतो. पण त्याचबरोबर सतत तोंड येण्यावर काही घरगुती उपायदेखील प्रभावी आहेत. असं तज्ज्ञांच मत आहे.

- Advertisement -

नारळाचे तेल

पौष्टीक घटकांनी युक्त असलेल्या नारळाच्या तेलात अँटी इफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे जिभेच्या त्वचेवरील फोड किंवा अल्सर यावर हे तेल वापरावावे. हे तेल दिवसातून तीन ते चार वेळा जीभेवरील अल्सरला लावावे. लगेच आराम मिळतो.

- Advertisement -

एलोवेरा जेल- त्वचा आणि केसांसाठी एलोवेरा जेल उपयुक्त आहे. या तेलाच्या वापरामुळे तोंडातील लालसरपणा जातो.  एलोवेरा जेल थोडावेळ जीभेवर ठेवल्यानंतर जिभेला आराम मिळतो.

तुळशी- औषधीगुणांनी संपन्न असलेल्ल्या तुळशीचे अनेक आरोग्यवर्धक उपयोग आहेत. त्वचेपासून शरीरात घेण्यापर्यंत तुळशीचा उपयोग होतो. तोंड आल्यास जीभेवर तुळशीची पेस्ट लावावी. लगेच आराम मिळतो.

आवळा- आवळ्यात व्हिटामीन सी असते. तोंड आलेले असताना आवळा खाल्ल्यास आराम मिळतो.

हिरवी वेलची- तोंड आलेल्या व्यक्तीने हिरवी वेलची खाल्ल्यास आराम मिळतो. तोंडातील उष्णता कमी होते. तसेच हिरवी वेलची बारीक कुटून त्यात मध टाकून त्याच चाटण करावे. काहीवेळानंतर पाण्याची गुळणी करावी. myतोंड लगेच बरे होते.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -