Wednesday, May 31, 2023
घर मानिनी झणझणीत पापलेटचे सांबर बनविण्याची ही पद्धत वापरून पहा

झणझणीत पापलेटचे सांबर बनविण्याची ही पद्धत वापरून पहा

Subscribe

घरच्या घरी तळलेले पापलेट सर्वजणच करतात. तसेच पापलेट हा पदार्थ बनविण्यास अगदी सोपा आहे. मांसाहारी लोकांचा पापलेट हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज आम्ही तुम्हाला पापलेटचे सांबार कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ साहित्य आणि कृती.

 

- Advertisement -

साहित्य-

  • 2 मोठे पापलेट्स
  • 1 लहान कांदा
  • 1/2 चमचा धने
  • 1 नारळाचे खोबरे
  • 7-8 काळी मिरी
  • 1/2 चमचा तेल
  • 1/2 टी स्पून हळद
  • 1/2 टी स्पून तिखट
  • 1 लिंबा एवढी चिंच
  • मीठ चवीप्रमाणे

 

- Advertisement -

कृती

How to Make a Mangalorean Pomfret Fish Curry - Licious Blog

  • पापलेटच्या तुकड्यांना हळद,मीठ,तिखट लावून अर्धा तास ठेवणे.
  • 1 वाटी ओल्या खोबऱ्यात अर्धा कांदा बारीक चिरून,धने,मिरे घालून बारीक वाटण करून घेणे.
  • उरलेल्या खोबऱ्याचा रस काढावा. पहिला जाड रस वेगळा व नंतरचा पातळ रस वेगळा ठेवावा. थोड्या तेलावर बारीक चिरलेला कांदा नरम करून घ्यावा.
  • त्यावर पापलेटचे तुकडे टाकून थोड्या पाण्यात ते शिजून घ्यावे.
  • मग खोबऱ्याचा पातळ रस,चिंचेचा रस आणि वाटण घालावे.
  • शेवटी खोबऱ्याचा जाड रस व कोथिंबीर घालून उकळी काढून उतरवावे.
  • चिंच नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. चव चांगली येते.
  • सांबार छान असे जाडसर घट्ट असावे.
  • पातळ वाटल्यास चिमूटभर तांदळाचे पीठ पाण्यात कालवून सांबराला लावावे व एक उकळी काढावी.

 


हेही वाचा :-

घरच्या घरी बनवा ‘ग्रील्ड चिकन

 

- Advertisment -

Manini