घरलाईफस्टाईलरिंगा रिंगा 'नोजेस'

रिंगा रिंगा ‘नोजेस’

Subscribe

विविध आकाराच्या, स्टोनच्या आणि वेगवेगळ्या डिजाइन्सच्या नोज रिंग उपलब्ध असून आपण आपल्या पसंतीनुसार निवडू शकता. परंतु आपल्या चेहऱ्यानुसार नोज रिंगची निवड केल्यास चेहरा उठावदार आणि सुंदर दिसण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया. चेहऱ्यानुसार कोणत्या नोज रिंगचा वापर करावा.

भारतीय महिलांच्या दागिन्यांपैकी नोज रिंग हा एक मुख्य दागिना आहे. बहुतांश स्त्रिया या लग्न समारंभात नोज रिंग घालणे पसंत करतात. आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारच्या नोज रिंग पाहायला मिळतात. त्यातील पारंपारिक नथ ही अजूनही तितकीच प्रसिद्ध असून ती सणासुदीला घातली जाते. त्याचबरोबर आता विविध आकाराच्या, स्टोनच्या आणि वेगवेगळ्या डिजाइन्सच्या नोज रिंग उपलब्ध असून आपण आपल्या पसंतीनुसार निवडू शकता. परंतु आपल्या चेहऱ्यानुसार नोज रिंगची निवड केल्यास चेहरा उठावदार आणि सुंदर दिसण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया. चेहऱ्यानुसार कोणत्या नोज रिंगचा वापर करावा.

डायमंड नोज रिंग

डायमंड नोज रिंग कोणत्याही आकाराच्या चेहऱ्याला उठून दिसते. ही नोज रिंग गोल, लांब आणि ओव्हल चेहऱ्याच्या व्यक्ती घालू शकतात. त्यांच्या चोहऱ्यावर ही डायमंड नोज रिंग उठून दिसते.

- Advertisement -

पारंपारिक नथ

लग्न समारंभात अनेक स्त्रिया पारंपारिक नथीचा वापर करतात. नऊवारी आणि सहावारी साड्यांवर ही पारंपारिक नथ घातल्याने सौंदर्य खुलून दिसते. ही पारंपारिक नथ सणासुदीला देखील वापरण्यात येते.

गोल्ड अँड डायमंड नोज रिंग

ही नोज रिंग सध्या बाजारात दाखल असून या नोज रिंगला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही नोज रिंग कॉलेज तरुणींपासून ते महिलांपर्यंत कोणीही वापरु शकतो. ट्रेडिशनल आणि वेस्टर्नवर देखील ही नोज रिंग वापरता येऊ शकते.

- Advertisement -

फ्लॉवर स्टँड नोज रिंग

ही रिंग बाजारात सहज उपलब्ध होते. ज्या व्यक्तींचा चेहरा उभा असतो आणि ज्या व्यक्तींचे नाक लांबसडक असते अशा व्यक्तींना फ्लॉवर स्टँड नोज रिंग उठावदार दिसते. या रिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आढळून येतात.

फ्लॉवर बेंट नोज रिंग

फ्लॉवर स्टँड नोज रिंगपेक्षा ही रिंग थोडीशी वेगळी असते. या रिंगला वरुन फुलं असतात आणि खालच्या बाजूनेही रिंग थोडीशी झुकलेली असते. ही रिंग सर्व चेहऱ्याला शोभेल अशी असते. यामध्ये डायमंड रिंगला अधिक प्रमाणात मागणी आहे.

मोठी नोज रिंग

पारंपारिक पोशाखांवर मोठी नोज रिंग अधिक सुंदर दिसते. ही रिंग अंगठीच्या आकाराची असून ती पूर्णपणे नाकाला कवर करते. तसेच ही रिंग गोल चेहऱ्याला उठून दिसते.

फॅन्सी वायर नोज रिंग

ही नोज रिंग गोल्ड आणि डायमंडमध्ये बनवता येते. या नोजची रचना वायरी सारखी असून या रिंगच्या वरच्या बाजूला डायमंड असतात. यामुळे चेहरा सुंदर आणि चमकतो देखील.


-प्रज्ञा घोगळे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -