घरलाईफस्टाईलबाळाची घ्या काळजी

बाळाची घ्या काळजी

Subscribe

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. या दिवसात घरातील लहान मूल चिडचिडे होऊन सतत रडत असेल तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता जवळील बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे बाळाच्या नाजूक, मुलायम त्वचेला इजा पोहण्याची दाट शक्यता असते. तेव्हा या दिवसात बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे.

सुती कपडे घाला – उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला सैलसर, सुती कपडेच घालावेत. सिंथेटिक कापड वापरलं तर त्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या अंगावर घामोळं येऊ शकतं. आजकाल बाजारात कॉटनचे लांब हात-पाय असलेले कपडे मिळतात. त्याचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही क्रीम लावू नका. उन्हापासून वाचण्यासाठी त्याला टोपी घाला. पण ही टोपी आकाराने थोडी मोठी असावी. एकदम घट्ट घातली की त्याचा त्रासही मुलांना होतो.

- Advertisement -

कापसाच्या गादीचा वापर करा – या दिवसात लहान मुलांना झोपवण्यासाठी कापसाच्या गादीचाच वापर करावा. कारण फोमच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गाद्यांमुळे त्यांना गरम होऊ शकतं. कापसाच्या गादीमुळे गरम होत नाही आणि हवाही त्यांच्यापर्यंत पोहोचते.

डायपरचा वापर कमी करा – आजकाल मुलांना डायपर घातलं जातं, मात्र उन्हाळ्यात डायपरचा वापर कमीच करावा. या डायपरमुळे घाम त्वचेवरच राहतो. त्वचा सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे किंवा ती लाल होणे असे विकार होऊ शकतात. म्हणून या दिवसांत डायपरचा वापर कमीच करा. त्याऐवजी कापडाचा वापर करावा. कपड्यामुळे त्वचा कोरडी राहते.

- Advertisement -

मालिश नकोच – नवजात बालकांना तेलाने मालिश केल्याने घाम त्वचेवरच राहतो. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. त्यातही तुम्हाला उन्हाळ्यात मालिश करायचं असेलच तर ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा. जे मुळातच थंड असतं. मात्र अंघोळीच्या वेळी हे तेल पूर्णत: स्वच्छ होईल, याकडे लक्ष द्यावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -