घरलाईफस्टाईलआभासी जगामुळे संवाद संपला

आभासी जगामुळे संवाद संपला

Subscribe

सोशल मीडियाने विश्वातील असंख्य माणसांचे जीवन व्यापल्याने या माध्यमांचा पगडा दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियाचे जसे चांगले फायदे आहेत तसेच दुष्परिणामदेखील आहेत. या नवमाध्यमांच्या आहारी गेल्याने मनुष्य एकलकोंडा बनून आभासी जीवन जगणे अधिक पसंत करू लागला. यामुळे नैराश्य वाढून तरुणाईला ताण-तणावास सामोरे जावे लागत आहे.

सर्वच वयोगटातील मंडळींवर डिजिटलायझेशनचा प्रभाव अधिक दिसतो. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेल्याचे दिसते. आपल्या भावना, विचार, मत मांडण्यासाठी जरी हक्काचे व्यासपीठ मिळाले असले तरी त्यात नेमके काय योग्य अयोग्य आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे तसेच नेटवर्कींग साईटच्या माध्यमातून एका क्लिकवर विश्वातील माहिती सहज मिळणे शक्य झाले आहे. माणूस कोणत्याही ठिकाणी असला तरी या सोशल नेटवर्कींगमुळे तो कनेक्ट मात्र राहू शकतो, ही सोशल मीडियाची जमेची बाजू म्हणता येईल. परंतु, इंटरनेट, समाज माध्यमांच्या व्यसनाने परस्परांशी वाढत असणारी स्पर्धा, बदलणारे राहणीमान यासोबतच काही अपेक्षांची पूर्ती न झाल्यामुळे पदरी पडणारे नैराश्य यामुळे आजची तरुणाई ताण-तणावास सामोरे जात आहे.

- Advertisement -

ही सोशल मीडियाची माध्यमं जरी उपयुक्त असली तरी वास्तवात मात्र माणसांमधील सुसंवाद संपताना दिसत आहे. यामुळे भावनिक नातं काहीसे कमी होऊन आभासी जगण्यास तरुणाईचा कल वाढत आहे. या आभासी जगात वावरताना आपापसात होणारे मतभेद वाढून प्रसंगी गुन्हेगारी करण्यास काही जण सरसावले आहेत. या कारणामुळे नवयुवकांचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच उद्ध्वस्त होत आहे.

जीवनाचे आभासी चित्र रंगवताना नैराश्यासोबत द्वेषाची भावनादेखील कुठेतरी वाढीस लागण्यास कारणीभूत आहे. काही मानसोपचारतज्ज्ञांनी केलेल्या निरीक्षणानुसार, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाईट प्रभावामुळे काही तरुण स्वत:चे आक्षेपार्ह असणारे फोटो शेअर करणे, कोणत्या क्षणाला कुठे आहोत याचे अपडेट देणे, मौज-मस्ती करण्यास गैर मार्ग अवलंबणे अशा मानसिकतेला खतपाणी घातले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -