घरलाईफस्टाईलगर्भवतींनो सावधान

गर्भवतींनो सावधान

Subscribe

र्‍हिसस निगेटिव्ह आई-आरएचचा वेळीच करा प्रतिबंध - भाग २

आरएच आजारावर उपचार कशा पद्धतीने केले जातात ?                                                                  आजार किती गंभीर आहे यावर उपचारपद्धती अवलंबून असते

इंट्रायुटेराइन रक्त संक्रमण- ३७ आठवड्यांच्या आत – यामध्ये गर्भाच्या रक्ताभिसरणात लाल रक्तपेशी सोडल्या जातात. या उपचारांत गर्भाशयातून सुई घातली जाते (आईचे गर्भाशय की बाळाचे गर्भाशय ते स्पष्ट करावे). ही सुई बाळाच्या उदरपोकळीतून नाळेच्या शिरेपर्यंत जाते. गर्भाची हालचाल टाळण्यासाठी काही झोपेची औषधे दिली जाऊ शकतात. काही वेळा एकाहून अधिक संक्रमणांची गरज भासते.

- Advertisement -

मुदतपूर्व प्रसूती – लाल रक्तपेशींचे सातत्याने विभाजन होत राहिल्याने बाळ अशक्त झाले असेल तर हे पाऊल निओनेटल (नवजात अर्भक) केअर युनिटच्या मदतीने उचलले जाते.

आरएच आजाराचा प्रतिबंध शक्य आहे का?
हो, आरएच आजाराचा प्रतिबंध शक्य आहे. प्रत्येक स्त्रीने गर्भधारणेपूर्वी किंवा गरोदरपणाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या रक्ताचा प्रकार जाणून घेण्यासाठी चाचणी करून घ्यावी. ही स्त्री सेन्सिटायझेशनशिवाय आरएच निगेटिव्ह आहे असे आढळल्यास आरएच इम्युनोग्लोब्यलिन (आरएचओजीएएम) हे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. या औषधामुळे प्रतिद्रव्यांची बाळाच्या शरीरातील आरएच पॉझिटिव पेशींसोबत प्रतिक्रिया थांबवली जाऊ शकते. आरएचओजीएएम इंजेक्शन गरोदरपणाच्या साधारण २८व्या आठवड्यात दिले जाते. मात्र, संबंधित स्त्रीला योनीमार्गातून रक्तस्राव, आघात किंवा अम्नियोसिंथेसिस अशा समस्या २८ आठवड्यांपूर्वीच जाणवल्यास हे इंजेक्शन लवकरही दिले जाते. बाळ आरएच पॉझिटिव असेल तर या इंजेक्शनचा दुसरा डोस बाळाच्या जन्मानंतर ७२ तासांच्या आत दिला जातो. बाळ आरएच निगेटिव असेल तर दुसरा डोस देण्याची गरज नाही.

- Advertisement -

आरएच आजाराबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे

* आरएच आजार गरोदरपणात होतो. आई व गर्भाच्या रक्तामधील आरएच घटकातील विसंगतीमुळे हा आजार होतो.
* आरएच निगेटिव्ह रक्तगट असलेल्या आईचे आरएच पॉझिटव रक्ताशी सेन्सेटायझेशन झाल्यास, तिची रोगप्रतिकार यंत्रणा बाळाच्या लाल रक्तपेशींवर हल्ला चढवण्यासाठी प्रतिद्रव्ये निर्माण करते.
* ही प्रतिद्रव्ये बाळाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात, तेव्हा त्याच्या लाल रक्तपेशी नष्ट होऊ लागतात आणि यामुळे बाळाच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.                                                                        *ही परीस्थिती टाळली जाऊ शकते. आरएच निगेटिव्ह रक्तगट असलेल्या व सेन्सिटाइझ न झालेल्या स्त्रियांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात. त्यामुळे त्यांच्या शरीरारीतल प्रतिद्रव्यांची बाळाच्या आरएच पॉझिटिव पेशींसोबत प्रतिक्रिया थांबवली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -