घरलाईफस्टाईलपावसाळ्यात टू व्हीलर चालवताय , मग घ्या काळजी

पावसाळ्यात टू व्हीलर चालवताय , मग घ्या काळजी

Subscribe

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालवावीत अशा सुचना दिल्या जातात. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचते तर बहुतांश रस्ते हे निरसडे होतात.त्यामुळे तुम्ही टू-व्हीलर पावसात चालवत असल्यास काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

-टायर्सची घ्या काळजी
जर तुमच्या बाइक किंवा स्कूटरचे टायर्स झिजले असतील तर ते लगेच बदलून घ्या. कारण पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात आणि अशा रस्त्यांवरुन गाडी चालवली तर घसरण्याची शक्यता असते.

- Advertisement -

-हेल्मेट घाला
पावसाळ्यात कधीच विनाहेल्मेट गाडी चालवू नका. एकतर पावसाचे पाणी सतत तुमच्या डोळ्यांवर पडत राहते आणि त्यामुळे पुढचे स्पष्टपणे दिसत नाही. अशातच तुम्ही पडण्याची किंवा एखाद्याला धक्का देण्याची शक्यता असते.

-अचानक ब्रेक दाबू नका
पावसाळ्यात अचानक ब्रेक दाबू नका. यामुळे तुमची गाडी पुढे ढकलली जाईल. जर ब्रेक दाबायचा असेल तर दोन्ही दाबा.

- Advertisement -

-वेगाने गाडी चालवू नका
पावसाळ्यात रस्ते निसरडे होतातच. पण तुमच्या गाडीचा वेग अधिक असेल तर तुम्ही पडू शकता. कधीकधी पुढे वाहन नाही म्हणून पावसात गाडी वेगाने घेऊन जात असाल तर अशी चुक सुद्धा करु नका. पुढे असलेल्या खड्ड्यात गाडी अडकू शकते हे लक्षात ठेवा.

-साचलेल्या पाण्यात गाडी चालवणे टाळा
पावसाळ्यात अशा रस्त्यांवरुन गाडी चालवू नका जेथे खुप पाणी साचले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.


हेही वाचा- पावसाळ्यात फिरायला जाताय मग बॅगेत ‘या’ गोष्टी हव्याच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -