घरCORONA UPDATEदेशात कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख पार; आतापर्यंत ९८ हजार रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख पार; आतापर्यंत ९८ हजार रुग्णांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ६३ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासात देशात ८६ हजार ८२१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार १८१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ६३ लाख १२ हजार ५८५ इतके एकूण कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये ९ लाख ४० हजार ४०५ इतके अॅक्टिव्ह केसेस असून ९८ हजार ६७८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५२ लाख ७३ हजार २०२ जणांनी आजारावर यशस्वी मात केली आहे, ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोना संकटच्या काळात काल, बुधवारी केंद्र सरकारने अनलॉक ५ ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार १५ ऑक्टोबर पासून सिनेमागृह, थिएटर, मल्टीप्लेक्स ५० टक्क्यांच्या उपस्थितीत सुरु करता येणार आहेत. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय वेगळे आदेश काढणार आहेत. केंद्र सरकारने शाळा आणि शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी १५ ऑक्टोबर नंतर राज्य सरकारांना अधिकार दिले आहेत. १५ तारखेनंतर राज्य सरकार त्यांच्या अखत्यारित निर्णय घेऊ शकतात. मात्र त्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे.

हेही वाचा –

हाथरस प्रकरण ताजे असताना मध्यप्रदेशात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -