घरलाईफस्टाईलफॉर्मल वापरा; व्यक्तीमत्व खुलवा!

फॉर्मल वापरा; व्यक्तीमत्व खुलवा!

Subscribe

फॉर्मल्स कपड्यांमध्ये आपण नेहमीच छान दिसतो.पण आपण काही वेळा जास्त स्टाईलीश दिसण्याच्या नादात खुप साध्या चुका करून बसतो. जाणून घेऊया अशा १० चुका ज्या आपलं इम्प्रेशन खराब करू शकतात.या चुका टाळल्यात तर तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व आणखीच सुंदर बनवू शकता.

फॉर्मल्समध्ये आपलं व्यक्तीमत्व नेहमीच खुलून दिसतं. चांगली हेअरस्टाईल, नीट मेंटेन केलेली दाढी,सुगंधित परफ्युम्स या सगळ्यांसोबतच चांगले फॉर्मल्स कपडे घालणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. फॉर्मल्स कपड्यांमध्ये आपण नेहमीच छान दिसतो.पण आपण काही वेळा जास्त स्टाईलीश दिसण्याच्या नादात खुप साध्या चुका करून बसतो. जाणून घेऊया अशा १० चुका ज्या आपलं इम्प्रेशन खराब करू शकतात.या चुका टाळल्यात तर तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व आणखीच सुंदर बनवू शकता.

१- एखादा चांगला सूट घातल्यावर त्यावर बॅगपॅक अजिबात घेऊ नका.
त्या ऐवजी ऑफिस सुटकेस वापरा.

- Advertisement -

२- नीट तयार होताना आपण एक चूक नेहमी करतो, ती म्हणजे बेल्ट आणि बूट हे वेगवेगळ्या रंगाचे घालतो असे अजिबात करू नका.

३- सूट घालून कुठेही गेलात तरी खुर्चीवर बसताना नेहमी सूटची बटन काढून मगच बसा.तसे न केल्यास सुटची इस्त्री खराब होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

४- तयार होताना कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज वापरा. अ‍ॅक्सेसरीजचा ओव्हरडोस होणार नाही याची काळजी घ्या.

५- तयार होताना टाय आणि पॉकेट साईझ हा कधीच एकसारखा असू नये.
टाय हा वेगळ्या टेक्सचरचा असेल तर पॉकेट साईझचा पॅटर्न वेगळा ठेवा.

६ – सूटस घालताना त्याला बटणं किती असावी याचे लिखित नियम काही नसले तरी फॅशन सेन्स असलेली माणसं २ बटणं लावतात. कारण खूप बटणं असं हे सुट्सला अजिबात शोभत नाही आणि ते दिसायला सुद्धा खूप ऑड दिसतं.

७- फॉर्मल्समध्ये जसा शर्ट, सूट महत्वाचे असतात त्याचप्रमाणे आपण ट्राऊजर कोणत्या प्रकारची घालतोय ते सुद्धा महत्वाचं असत. आपल्या ट्राऊजरचा बॉटम हा पायघोळ नसावा.थोडक्यात काय तर we are killng fashion.

८- चांगल्या प्रकारचं कापड वापरणं हे सुद्धा महत्वाचं असत. कारण जितकं चांगलं कापड तेवढ्या जास्त काळ तो शर्ट, पँट टिकतो.

९- फॉर्मल्समध्ये टाय सुद्धा महत्वाचा असतो. कारण चांगल्या टायमुळे तुमचं व्यक्तीमत्व अजून जास्त चांगलं दिसतं. चांगल्या फॉर्मल्सवर एकदम त्याला शोभेल असा टाय घालावा.

१०- बघणार्‍या माणसाला त्रास होईल असे, एकदम शाईन करणारे किंवा झगमगीत शर्ट अजिबात घालू नका.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -