घर लाईफस्टाईल सकाळचा नाश्ता किती वाजता करावा? कोणती आहे योग्य वेळ?

सकाळचा नाश्ता किती वाजता करावा? कोणती आहे योग्य वेळ?

Subscribe

सकाळचा नाश्ता हा सर्वोत्तम मानला जातो. मानवी शरीर ही एक यंत्रणाच आहे. शरीराला योग्य आहार आणि पोषण न मिळाल्याने बरेच लोक गंभीर आजारांना बळी पडतात. नाश्ता वेळेत न केल्यास एनर्जी लेव्हल डाउन होऊ शकते. साधारण सकाळी7-10 या वेळेत बरेच लोक नाश्ता करतात. आणि हीच नाश्त्याची योग्य वेळ आहे असा अनेकांचा समजही आहे. मात्र नाश्त्याची योग्य वेळ नेमकी कोणती हे 90% लोकांना माहिती नाही. चला तर आज याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

34 Healthy Breakfasts for Weight Loss - Low-Calorie Breakfast Recipes

- Advertisement -

जर तुम्ही सकाळचा नाश्ता सोडला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होते आणि रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच तुमच्या आरोग्यासाठी आणि संतुलित जीवनशैलीसाठी योग्य वेळी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे.

सकाळी योग्य वेळी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या शरीराला योग्य वेळी पुरेसी ऊर्जा मिळाली नाही, तर तुम्हाला सकाळपासूनच थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. यासोबतच, योग्य वेळी नाश्ता न केल्याने तुमची भूक वाढू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीराचे वजन वाढण्याची शक्यताही वाढू शकते.

नाश्ता करण्याची योग्य वेळ?

  • सकाळी 7ते 8 ही वेळ नाश्ता करण्याची उत्तम वेळ मानली जाते.
  • तसेच या कालावधीत तुम्ही नाश्ता करू शकत नसल्यास, सकाळी 10 वाजण्यापूर्वी करा.
  • शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही उशिरा उठत असाल तर, झोपेतून उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करणे ही सर्वोत्तम वेळ आहे.=
  • कारण रात्रीच्या जेवणानंतर 8 तासांच्या गॅपमुळे आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि सकाळी ग्लुकोजची पातळी सहसा कमी असते.
  • नाश्ता केल्याने आपली पचनक्रिया सक्रिय होते आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळते.
  • नाश्त्यात फळे, भाज्या आणि तृणधान्ये घेतल्यास शरीराला फायबर मिळते जे पचनासाठी चांगले असते.
  • तुम्ही ओट्ससुद्धा खाऊ शकता. फळ आणि भाज्यांची स्मूदी, अंडी आणि टोस्ट यांचादेखील समावेश तुम्ही नाश्त्यात करू शकता.
  • सकाळी नाश्ता खाल्ल्याने भूक कमी होते, ज्यामुळे तुमचे जेवण नीट होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • त्यामुळे सकाळचा नाश्ता करणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा : 

उचकी कशामुळे लागते? थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोप्पे उपाय 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -