घरक्राइमSharad Mohol हत्या प्रकरणात मुख्य आरोपी विठ्ठल शेलार, रामदास मारणेसह 11 जण...

Sharad Mohol हत्या प्रकरणात मुख्य आरोपी विठ्ठल शेलार, रामदास मारणेसह 11 जण ताब्यात

Subscribe

गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

नवी मुंबई: गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पनवेल पोलिसांनी सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमिका आहे. (11 people including main accused Vitthal Shelar Ramdas Marne in Sharad Mohol murder case)

5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळचे साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही सहभाग आहे. गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांचा शपद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलिसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोण होता शरद मोहोळ

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणयासारखे अनेक गुन्हा दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

(हेही वाचा “धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचे षडयंत्र”, Sanjay Raut यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -