घरमहाराष्ट्रआता १०० नाही तर 'या' नंबरवर मिळणार पोलिसांची मदत

आता १०० नाही तर ‘या’ नंबरवर मिळणार पोलिसांची मदत

Subscribe

पोलिस मदत घेण्यासाठी आधी  १०० नंबरवर कॉल केला जात होता. मात्र, कॉल नेमका कोणत्या तक्रारीसाठी आला, याबाबत शंका असायची. अनेकदा तक्रारदाराकडून चुकीची माहितीही देण्यात येत होती. त्यामुळे पोलीस आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी आता फक्त एकच आपत्कालीन हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. आता १०० नंबरवर नाही तर ११२ नंबरवर पोलिसांनी मदत मिळणार आहे. नागरिकांना तक्रारीसाठी 112 ही नवी हेल्पलाईन असणार आहे. सध्या पुण्यामध्ये ही हेल्पलाईन वापरली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही हेल्पलाईन वापरली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे.

पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन या सर्वांसाठी 112 हा एकमेव आपत्कालीन हेल्पलाईन नंबर असणार आहे. एकाच नंबरवर सगळ्या प्रकारची आपत्कालीन मदत मिळणार आहे. जीपीएस यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठुल आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल होईल.

- Advertisement -

याआधी पोलिसांच्या मदतीसाठी 100 नंबर, महिला हेल्पलाईनसाठी 1091 आणि चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हे नंबर उपलब्ध होते. मात्र, आता या सर्वांसाठी 112 हा नंबर असेल. या नंबरवरुन मदत मागितल्यास घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्यांची माहिती जाईल. याद्वारे तक्रारदाराला कमीत कमी वेळात मदत केली जाईल. इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम (ERSS)यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे.

पोलिस मदत घेण्यासाठी आधी  १०० नंबरवर कॉल केला जात होता. मात्र, कॉल नेमका कोणत्या तक्रारीसाठी आला, याबाबत शंका असायची. अनेकदा तक्रारदाराकडून चुकीची माहितीही देण्यात येत होती. त्यामुळे पोलीस आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मात्र अडचणी दूर होणार असून कमीत कमी वेळेत संकटात सापडलेल्यांना मदत करणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -