घरताज्या घडामोडीपुणेकरांची चिंता कायम! २४ तासांत आढळले १५८४ नवे रुग्ण; २८ जणांचा मृत्यू

पुणेकरांची चिंता कायम! २४ तासांत आढळले १५८४ नवे रुग्ण; २८ जणांचा मृत्यू

Subscribe

पुणे शहर जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ५८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद असून शहरातील एकूण रुग्णसंख्या ६९ हजार २३५ एवढी झाली आहे.

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल १ हजार ५८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ६९ हजार २३५ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज अखेर ५२ हजार ८०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले १०५२ रुग्ण

पुण्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात एकूण १ हजार ५२ जण कोरोनाबाधित आढळले असून यांपैकी २८ जण ग्रामीण भागातील आहेत. तर १५ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ६४३ वर पोहोचली असून यांपैकी २२ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

२०७ जणांनी केली कोरोनावर मात

दरम्यान, आज २०७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेतील रुग्णालयात ६ हजार १३० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात १२,७१२ नव्या रुग्णांची नोंद, ३४४ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -