घरमहाराष्ट्रहुबळी येथे बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; ६ जण ठार 

हुबळी येथे बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; ६ जण ठार 

Subscribe

मुंबईवरुन एका खासगी बसने ते कर्नाटक फिरण्यासाठी काही पर्यटक आलेल्या पर्यटकांच्या बसला अपघात झाला आहे. ट्रक आणि बसच्या धडकेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत.

कर्नाटकमध्ये खासगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातल्या धारवाड तालुक्यातील अंनिगेरी गावाजवळ ही घटना घडली आहे. अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. खासगी बसमधील सर्व प्रवाशी मुंबईचे आहेत. अपघातामध्ये मृत झालेले सर्व जण मुंबईचेच असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना हुबळी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना 

मुंबईवरुन कर्नाटकात सहलीसाठी आलेल्या एका खासगी बसला शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. धारवाड तालुक्यातील अंनिगेरी गावाजवळ बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला. मुंबईवरुन एका खासगी बसने ते कर्नाटक फिरण्यासाठी काही पर्यटक आले होते. ते हुबळीवरुन हम्पीकडे जात असताना ही घटना घडली. अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला ते सर्व जण मुंबईचे आहेत. जखमींना हुबळीच्या किमस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.

अपघातातील मृतांची नावे –

विश्वनाथ – ७८ वर्ष
दिनकर – ७४ वर्ष
रमेश जयमाल – ७० वर्ष
सुमेध जमखंडी – ६५ वर्ष
लहू केळुस्कर – ६५ वर्ष
सुचित्रा राहुल – ६५ वर्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -