घरमहाराष्ट्रराज्यात ६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

राज्यात ६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

Subscribe

येत्या काळात राज्यातील ६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे गोर गरीब रुग्णांना मोफत आणि कमी दरात उपचार मिळणार आहेत.

येत्या काळात राज्यातील ६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे गोर गरीब रुग्णांना मोफत आणि कमी दरात उपचार मिळणार आहेत. त्यासोबतच, घराच्या जवळच हा दवाखाना असल्याकारणाने रुग्णांना मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. आरोग्य विभागाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, आरोग्यवर्धिनी केंद्र, मिशन मेळघाट उपक्रम, रक्तदाब तपासणी यंत्र, डायलिसिस केंद्र आणि कर्करोग तपासणी अशा विविध उपक्रमांचा शुभारंभ राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, “आरोग्य, शिक्षण कुठलाही विभाग असो राज्यशासनाने त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सामान्यांना अधिक गतिमान आणि दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्यांना अपेक्षित सेवा देण्यासाठी राज्यशासन आहे.”

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “सामान्य नागरिकांना जे वचन दिले होते ते आरोग्याच्या विविध योजना सुरू झाल्यामुळे पूर्ण झाल्याचं समाधान आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी रिएल टाईम टेलिमेडिसीन तंत्रज्ञानावर भर द्यावा.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -