घरमुंबईमहालक्ष्मीतील जिमखाना अधिकार्‍यांसाठी नाहीच

महालक्ष्मीतील जिमखाना अधिकार्‍यांसाठी नाहीच

Subscribe

अधिकार्‍यांसाठी बांधण्यात येणार्‍या या जिमखान्याच्या बांधकामाच्या प्रस्तावाचा फेरविचार करताना या अटींचा समावेश करत मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांसाठी महालक्ष्मी येथे बांधण्यात येणार्‍या जिमखान्यात आता सर्वसामान्य जनतेसह आजी माजी नगरसेवकांना प्रवेश दिला जाणार आहे. अधिकार्‍यांसाठी बांधण्यात येणार्‍या या जिमखान्याच्या बांधकामाच्या प्रस्तावाचा फेरविचार करताना या अटींचा समावेश करत मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वसामान्यांसह आजीमाजी नगरसेवकांसाठी प्रवेश

महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावर महापालिका अधिकार्‍यांसाठी ५० कोटी रुपये खर्च करून जिमखाना बांधण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. परंतु हा स्थापत्य (शहर) समितीच्या बैठकीत तो दप्तरी दाखल करण्यात आल्यानंतर सभागृहातही तो परत पाठवून लावण्यात आला होता. त्यामुळे या प्रस्तावावर फेरविचार करण्याची सूचना सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ठरावाची ही सूचना सभागृहात मंजुरीसाठी मांडली असता, भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी अधिकार्‍यांच्या जिमखान्याला आपला विरोध आहे. केवळ अधिकार्‍यांसाठी हा जिमखाना न बांधता तिथे सर्वसामान्य जनता आणि आजी माजी नगरसेवक यांनाही प्रवेश दिला जावा, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. यापूर्वी आम्ही याठिकाणी महापौर निवासस्थानाची मागणी केली होती. परंतु आता त्यांच्या निवासस्थानाची जागा निश्चित झाल्याने आमची ही मागणी राहिल, असेही कोटक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विकास आराखड्याचा पहिला भाग मंजुर

त्यामुळे या फेरविचाराच्या सूचनेस तसेच कोटक यांच्या उपसूचनेला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याचे आरक्षण जिमखान्याचे असले तरी विस्तारीत आराखड्यात महापालिका अधिकार्‍यांसाठी निवासस्थान असे आरक्षण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सध्या विकास आराखड्याचा पहिला भाग मंजूर झाला आहे. तसेच, सीआरझेडची जागा जिमखान्याच्या बांधकामात येत नसल्याचे स्पष्ट करत याठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश मिळायलाच हवा, असे सांगितले. त्यावर महापौरांनी उपसूचनेसह मूळ प्रस्ताव मंजूर केला.

क्लबचे सदस्य बनलेल्या अधिकार्‍यांची चौकशी

महालक्ष्मी येथे अधिकार्‍यांसाठी जिमखाना बांधला जात असला तरी वरळीतील एनएससीआय या क्लबमध्ये अग्नि सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असतानाही अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी, जी/ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त, मालमत्ता विभागाचे उपायुक्त यांनी सदस्यत्व मिळवल्याचा आरोप केला. त्यामुळे अशाप्रकारे किती सनदी अधिकारी व महापालिका अधिकार्‍यांनी महापालिकेच्या जागांवर बांधलेल्या क्लबमध्ये सदस्यत्व मिळवले आहेत, असे सांगत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी गटनेते मनोज कोटक यांच्यासह रवी राजा, रईस शेख आणि यशवंत जाधव यांनी केली. त्यामुळे यांची यादीच जाहीर करून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय महापालिकेच्या भूखंडावर असलेल्या क्लबमध्ये महापालिका अधिकार्‍यांना सदस्यत्व स्वीकारता येणार नाही अशाप्रकारची अट समाविष्ट करावी अशीही सूचना त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -