घरCORONA UPDATECorona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त संख्या अधिक!

Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त संख्या अधिक!

Subscribe

राज्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येप्रमाणे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ११७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० हजार ३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच २४ तासांत २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ४४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १४ हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १९ लाख ६८ हजार ५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख ९१ हजार ४४० (१९.८८टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ८ हजार ५४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२ हजार ७३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -