घरताज्या घडामोडीपुणेकरांची चिंता कायम! रुग्णसंख्येने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

पुणेकरांची चिंता कायम! रुग्णसंख्येने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

Subscribe

पुणे शहर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल ३ हजार १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आतापर्यंत ९० हजारांचा आकडा ओलांडला आहे.

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल ३ हजार १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आतापर्यंत ९० हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर पुण्यात ६३९ रुग्ण गंभीर असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर २ हजार २०२ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याने धोका अद्याप टळलेला नाही. १ हजार २०३ रुग्ण मात्र, बरे होऊन घरी परतल्याने दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत करण्यात आल्या २ लाख चाचण्या

पुणे शहरात आतापर्यंत २ लाख ८१ हजार ८४० चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यत ६३९ रुग्णांची प्रकृती गंभीर झाली असून यापैकी ३९२ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून अतिदक्षता विभागात २४७ रुग्ण आहेत.

- Advertisement -

४ लाख ३६ हजार १०४ रुग्णांच्या चाचण्या

तर एकूण जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार १०४ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत नाही. उलट ती वाढत असल्याने रुग्णालये फुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या १८ हजार ४० झाली आहे. तर १ हाजर २०३ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत ३८ हजार ११७ रुग्ण बरे झाले आहेत. पुणे शहर जिल्ह्यात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी सोळा रुग्ण ससून रुग्णालयात दगावले आहेत. पुण्यात ३१ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.


हेही वाचा – मराठी भारती संघटना करणार वीज बिलाची होळी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -