घरमहाराष्ट्रमहाबळेश्वर येथे पिकनिसाठी आलेल्या २ तरुणांचा अपघाती मृत्यू

महाबळेश्वर येथे पिकनिसाठी आलेल्या २ तरुणांचा अपघाती मृत्यू

Subscribe

साताऱ्यामध्ये भीषण अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जण हे महाबळेश्वर फिरायला आले होते. पिकनिक जात असताना महाबळेश्वर -पाचगणी रस्त्यावर बोलेरो आणि टँकरची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

महाबळेश्वर- पाचगणी रोडवर बोलेरो आणि टँकरचा पहाटे पाचच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण उस्मानाबादवरुन पिकनिकसाठी साताऱ्यातील महाबळेश्वर येथे येत होते. हा अपघात महाबळेश्वर-पाचगणी रोडवरील अवकाळी येथे झाला आहे. साताऱ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि धुक्यांमुळे अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अपघातातील जखमींना साताऱ्यातील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर यामधील गंभीर असलेल्यांना दुसरीकडे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामध्ये बोलेरो गाडीचा समोरुन चक्काचुरा झाला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -