घरमहाराष्ट्रमुंबई, पुणेसह नाशिकमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

मुंबई, पुणेसह नाशिकमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

Subscribe

राज्यातील काही शहरात अवकाळी पाऊस परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या मुंबईसह पुण्यामध्ये थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकर सुखावलेला असतानाच आता राज्यातील काही शहरात अवकाळी पाऊस परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्कायमेट अनुसार लक्षद्वीप क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. त्यामुळे आता राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.

तीन दिवसांत तुरळक सरींचा अंदाज

मुख्यत: मुंबई, पुणे, डहाणू, रत्नागिरी, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला, नागपूर आणि अमरावती या ठिकाणी २४ ते २६ डिसेंबर दरम्यान पाऊस हजेरी लावेल अशी अपेक्षा आहे. वास्तविक, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात आज सायंकाळी पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी तुरळक सरी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लातूर, हिंगोली, जालना आणि बीडसह इतर अनेक शहरांमध्ये तीन दिवसांत तुरळक सरींची तर अहमदनगर, औरंगाबाद आणि महाबळेश्वरमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हवामानातील या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन ते चार दिवस किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, पाऊस थांबल्यानंतर साधारण २७ डिसेंबरपासून उत्तर किंवा ईशान्येकडून वारे वाहू लागल्याने रात्रीच्या तापमानात पुन्हा घट होणार आहे.


हेही वाचा – भाजपने आता आत्मचिंतन करावं; संजय राऊत यांची टीका


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -