घरमहाराष्ट्रहायकोर्टाच्या आदेशानंतर जरंडेश्वरचा लिलाव, माझा काहीही संबंध नाही - अजित पवार

हायकोर्टाच्या आदेशानंतर जरंडेश्वरचा लिलाव, माझा काहीही संबंध नाही – अजित पवार

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाटगे साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. जरंडेश्ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने २००७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्या साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या अशी सूचना करण्यात आली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असं अजित पवारांनी सांगितलं.

- Advertisement -

“गुरु कमोडिटीने विकत घेतलेला कारखाना तो बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड आणि माने यांनी चालवण्यासाठी मागितला होता. असे अनेक कारखाने चालवायला दिले जातात. पण दुर्दैवाने त्यांना पहिल्याच वर्षी पाच कोटींचा तोटा झाला. ३० ते ३५ वर्षांसाठी त्यांनी कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. जरंडेश्वर शुगर मिल नावाने त्यांनी जी कंपनी सुरु केली होती ती नंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी ती चालवायला घेतली. पण नंतरच्या काळातही तोटा झाला. नंतर रितसर परवानगी घेत त्याचा विस्तार करण्यात आला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आलं असून ते फेडलंही जात आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“ईडीकडून गुरु कमोडिटीच्या संदर्भात काहीतरी चौकशी सुरु आहे. ती सुरु असताना कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने टाच आणली आहे. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. त्यांच्यावर टाच का आणली याबाबत मी जास्त खोलात गेलो नाही. कारण त्या कंपन्यांशी माझा दुरान्वये संबंध नाही. ते ओमकार या व्यक्तीशी संबंधित ती कंपनी आहे. पण कारवाई झाली असल्याची गोष्ट खरी आहे. ईडीला चौकशीचा अधिकार आहे. मागे इतर अनेक संस्थानीं चौकशी केल्या असून त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच काम त्या कारखान्यावर अवलंबून आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -