घरमहाराष्ट्रराज्यातील सर्व जिमची तपासणी होणार

राज्यातील सर्व जिमची तपासणी होणार

Subscribe

# अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची घोषणा , # ऑनलाईन विक्री विरोधात कायदा करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करणार

राज्यात तरुणांना बॉडी बनविण्यासाठी जिम मधून स्टिरॉइड या उत्तेजक द्रव्य देत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून तरुणांना हानिकारक असलेल्या स्टिरॉइडआणि अन्य उत्तेजक द्रव्य तपासण्यासाठी राज्यातील सर्व जिम ची येत्या ६ महिन्यात चौकशी करणार असाल्याची घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनीं विधानसभेत केली. शिवाय ऑनलाईन विक्री थांबविण्यासाठी राज्य सरकारचा स्वतंत्र कायदा आणता येईल का हे तपासून एकाच तज्ञ समितीचे गठणं करून अहवाल मागविला जाईल अशीही घोषणा यावेळी केली.

विधानसभेत लक्षवेधी उपस्थित कारून आमदार अमित साटम यांच्यासह आमदार तामील सेल्वन सदर लक्ष वेधी उपस्थित करून राज्य सरकारचे लाक्ष वेधले होते. मागील आठवड्यात मुंबईतील मुंब्रा आणि कल्याण येथे कमीवेळात बॉडी बनविण्यासाठी जिम मधून उत्तेजक द्रव्य असलेले स्टिरॉइड औषध दोन तरुणांनी सेवन केले. मात्र दोन्ही तरुणांचा यामुळे मृत्यू झाला असून याबाबत विधानसभेत चर्चा उपस्थित केली गेली. सदर औषध आठवावा उत्तेजक द्रव्य ऑनलाईन अथवा जिम मध्ये विकल्या जाते. मात्र जिम मध्ये कुठल्याही प्रकारचे यांना विक्री परावाना नाही. त्यामुळे अशा औषधावर प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ राज्य सरकारने कायदा आणावा असेही मागणी आमदार अमित साठम यांनी केली. यावर मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अशा प्रकारची औषध बंदी करण्यासाठी आणि ऑनलाईन विक्री करण्यासाठी केंद्र सरकारनं कायदा करीत असून यात काही उणिवा असल्यास राज्य सरकार स्वतंत्र कायदा करण्याचा निश्चित विचार करेल असे जाहीर केले.

- Advertisement -

यावर आक्षेप घेत आमादार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात लोक मरत असतांना तुम्ही केंद्राकडे बोट का दाखवता ? असा खडा सवाल उपस्थित करून मंतत्रि शिंगांजे यांना धारेवर धरले. माणिकचंद गंगुटख्यावर बंदी घालतांना ज्यादा पाद्धतीने तुम्ही कायदा अस्तित्वात आणला त्या प्रमाणे आताही कायदा अस्तित्वात आणा असेही मागणी केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी एक महिन्यात सिक्स पॅक तयार करण्यासाठी तरुण अशा उत्तेजक द्रव्याच्या जाळ्यात अडकत आतून तरुणांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या स्टिरॉइड वर तात्काळ बंदी आणा अशी मागणी यावेळी केली. आमदार तामील सेल्वन यांनीं बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील खेळाडू कसे विविध आजारांना बळी पडत आहे.

याची माहिती सभागृहात विषद केली. आमदार आशिष शेलार यांनीही यावर सदर औषध घालण्याची मागणी केली. यावर मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीं अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधीकारी तसेच पोलीस अधिकारी यांचीं टीम तयार करून पुढील सहा महिन्यात  राज्यातील सर्व जिम ची तपासणी करून याठिकाणी विक्री करीत असलेल्या उत्तेजक द्रव्याची तपासणी करणार असल्याची घोषणा यावेळी ना. शिंगणे यांनी केली. शिवाय अशा औषध विक्री परवाना आणि औषध विक्री अन्न व औषाढ़ प्रशासन विभागाच्या अंतर्गत आणण्यात येईल. शिवाय ऑनलाईन विक्री प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारचा स्वतंत्र कायदा आणता येईल का ? याची तपासणी करून या संदर्भांत तज्ञ व्यक्तींचा एक अभ्यास गट गठीत त्याबाबत अहवाल मागवून योग्य ते पाऊले उचलली जाईल अशी घोषणा यावेळी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -