घरमहाराष्ट्रमाझ्या अंगावर कोणी आलं तर मी सोडणार नाही; अमृता फडणवीसांचा इशारा

माझ्या अंगावर कोणी आलं तर मी सोडणार नाही; अमृता फडणवीसांचा इशारा

Subscribe

मी आणि देवेंद्र फडणवीस आमची दोघांची वेगवेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. माझ्या अंगावर कुणी आलं तर मी सोडणार नाही. मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याला साथ देणाऱ्याला देखील सोडत नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिला. सोमवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या एका गाण्याला एका ड्रग पेडलरने अर्थसहाय्य पुरवल्याचा आरोप केला.

या आरोपांना उत्तर देण्यासाठी अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर थेट टीका केली. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीला लाथ मारली जाते. हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आहे, बिघडे नवाब व्हायचं आहे. तुम्ही बिघडे नवाबची उर्जा सुधरे नवाब मध्ये रुपांतरीत करा. तरच आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो नाहीतर आपलं काही खरं नाही आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं बिघडे नवाब, त्यांचा बॉस किंवा त्यांच्या सुपर बॉसला द्यावी लागतील, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

- Advertisement -

तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा. मला मध्ये आणू नका, असा हल्लाबोल अमृता फडणवीस यांनी केला. तसंच, अमता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका देखील केली. देवेंद्र फडणवीस ड्रग्ज पेडलरच्या पाठीशी असल्याचा आरोपावर बोलताना अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाला विचारावं कोण कुणाच्या पाठिशी आहे. बेनकाब नवाब भी होता है और वो जरुर होगा. फक्त वेळ यावी लागते, असं सूचक विधान त्यांनी केलं.

राणाचं नाव काढलं तर चुकीचं काय?

जयदीप राणाचं नाव गाण्यातून वगळण्यात आलं आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. रिव्हर मार्चला माहीत नसेल तो ड्रग्जमध्ये आहे. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

आम्ही कुणाला घाबरत नाही

मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले. आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते काय एक्सपोज करणार? आमच्याकडे जमीनी नाही, साखर कारखाने नाही, त्यामुळे ते आरोप करणारच. पण आम्ही कुणाला घाबरत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -