घरताज्या घडामोडीगृहिणींसाठी खुशखबर! लवकरच खाद्यतेलाचे भाव होणार कमी

गृहिणींसाठी खुशखबर! लवकरच खाद्यतेलाचे भाव होणार कमी

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरापासून खाद्यतेलाच्या दरात देखील वाढ होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. पण यादरम्यानच एक चांगली बातमी समोर आली आहे. या सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या घाऊक दरात किलोमागे ३ ते ५ रुपयांनी कपात होऊ शकते. आज, सोमवारी उद्योग संघटना एसईएने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खाद्यतेलाच्या घाऊक दरात किलोमागे ३ ते ५ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसईएने सोमवारी सांगितले की, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी या सणासुदीच्या दरम्यान खाद्य तेलाच्या घाऊक दरात ३ ते ५ रुपये प्रति किलोग्रॅम कमी करण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.

- Advertisement -

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार, सरकारच्या प्रयत्नांमुळे ३१ ऑक्टोबरला पाम तेलाच्या सरासरी किरकोळ किंमतीत २१.५९ टक्के कमी झाली. तर १ ऑक्टोबरला १६९.६ रुपये प्रति किलोग्रॅम होती. सोया तेलाची सरासरी किरकोळ किंमत १५५.६५ रुपये प्रति किलोग्रॅमवरून घसरून १५३ रुपये प्रति किलो झाली.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, शेंगदाणे तेल, मोहरीचे तेल आणि सूर्यफूल तेलाची सरासरी किरकोळ किंमत अनुक्रमे १८१.९७ रुपये प्रति किलोग्रॅम, १८४.९९ रुपये प्रति किलोग्रॅम आणि १६८ रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थित होती.

- Advertisement -

ग्राहकांना दिलासा देत सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) म्हणाले की, दिवाळी सण लक्षात घेऊन खाद्यतेलाच्या दरात ३ हजार रुपये ते ५ हजार रुपये प्रति टन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

खाद्य तेलाच्या दरात कमी करण्यासाठी अलीकडच्या दिवसात खूप प्रयत्न केले आहेत. ज्यामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयात शुल्कामध्ये कमी केली. शुल्क कपात केल्यानंतर एसईएने म्हटले की, १० ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरमध्ये पाम ओलिन, रिफाइंड सोया, रिफाइंड सूर्यफूल तेलाच्या घाऊक किंमतीत ७ ते ११ टक्के कमी आली.


हेही वाचा – Dhanteras 2021: सोनं खरेदी करताना करा असा भाव, बिल आवश्य पाहा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -