घरमहाराष्ट्रअण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

Subscribe

अण्णांना जास्त थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आज आणि उद्या दोन दिवस आणखी काही तपासण्या आणि काही उपचारासाठी हॉस्पिटलला थांबवून घेतले आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अण्णांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहिये. त्यामुळे त्यांना जास्त थकवा जाणवत आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले असून डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मागणीसाठी सात दिवस उपोषण केले होते. त्यावेळी देखील अण्णांची प्रकृती बिघडली होती मात्र आता त्यांच्या प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अण्णांवर उपचार सुरु

दरम्यान, अण्णा हजारे यांनी सात दिवस केलेल्या उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. कालपासून जास्त अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात चेकअपसाठी आणण्यात आले. डॉ. सय्यद आणि डॉ. धनंजय पोटे यांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी त्यांना अहमदनगरमधील युनिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. डॉ. सुहास घुले यांच्याकडून नुकत्याच महत्त्वाच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. परंतू जास्त थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आज आणि उद्या दोन दिवस आणखी काही तपासण्या आणि काही उपचारासाठी हॉस्पिटलला थांबवून घेतले आहे. सध्या नोबल हॉस्पिटलला डॉ. बंदिष्टी आणि डॉ. कांडेकर यांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अण्णांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चिंतेचे काहीही कारण नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -