घरमहाराष्ट्र७९ हजारांचा फोन लंपास

७९ हजारांचा फोन लंपास

Subscribe

क्रोमा सेंटरमध्ये आलेल्या एका ग्राहक रुपी चोरट्याने मोबाईल फोनवर बोलण्याचा बहाणा करत ७९ हजार रुपये किंमतीचा अँपल कंपनीचा मोबाईलवर हात साफ केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या क्रोमा सेंटर मधून एका चोरट्याने तब्बल ७९ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

रवींद्र कालिदास क्षीरसागर वय-२९ रा.वाल्हेकरवाडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शुक्रवार रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास क्रोमा सेंटरमध्ये आलेल्या एका ग्राहक रुपी चोरट्याने मोबाईल फोनवर बोलण्याचा बहाणा करत ७९ हजार रुपये किंमतीचा अँपल कंपनीचा मोबाईलवर हात साफ केला. मोबाईल लंपास करताच चोर हा क्रोमा सेंटरच्या बाहेर पडला आणि फरार झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -