घरक्राइमएटीएम फोडून २६ लाखांची रोकड पळविणाऱ्यांना राजस्थानमधून अटक

एटीएम फोडून २६ लाखांची रोकड पळविणाऱ्यांना राजस्थानमधून अटक

Subscribe

भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी । भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम गॅसने कापून त्यामधील २६ लाख ४ हजार ५०० रुपयांची रोकड पळवून नेणाऱ्या पाच जणांच्या टोळीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान येथून शिताफीने अटक केली आहे. नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पुर्णा येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे.

पहाटे दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम कापून त्यामधील २६ लाख ४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी करून चोरटे फरार झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने सुरु होता. त्यामध्ये गुन्ह्याचे घटनास्थळी मिळुन आलेल्या मुद्देमालाचा बारकाईने अभ्यास केला. गुन्ह्यात चोरट्यांनी वापरलेल्या १० लिटर क्षमतेचा ऑक्सिजन सिलिंडरची माहिती घेतली. परिश्रम घेवून गुन्ह्यातील मुख्य आरोपी एटीएम मशिन कापणारा शराफत अजमत खान (२७) यास कैथवाडा, जि. भरतपुर, राजस्थान येथुन ताब्यात घेतले आणि भिवंडीत आणले.

- Advertisement -

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात इलियास युनुस खान (५२), गुलाम इलियास खान (२७) , शोएब इलियास खान(२७ सर्व रा.मुंब्रा रेल्वे स्टेशनचे बाजुला मुंब्रा), ठाणे,तौफीक रफीक अंसारी (२४) (रा.कौसा मुंब्रा) यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्कुटी आणि मोटार सायकल अशी दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेने नारपोली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिलेले आहे. भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी धनराज केदार, रामसिंग चव्हाण, रविंद्र पाटील, हवालदार सुनिल साळुंखे, मंगेश शिर्के, साबीर शेख, रंगनाथ पाटील, भास्कर शिंदे,पोना सचिन जाधव, शिपाई भावेश घरत, प्रशांत बर्वे, जितेंद्र पाटील, रोशन जाधव, पोलीस कर्मचारी माया डोंगरे, श्रेया खताळ हे पोलीस पथक करीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -