घरमहाराष्ट्रमराठी म्हणून मलाही घर नाकारलं होतं; पंकजा मुंडे यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

मराठी म्हणून मलाही घर नाकारलं होतं; पंकजा मुंडे यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

Subscribe

मुंबईतल्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला भाड्यानं घर देणं नाकारलं. यावरून मोठा संताप व्यक्त केला जात असून सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

मुंबईतल्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला भाड्यानं घर देणं नाकारलं. यावरून मोठा संताप व्यक्त केला जात असून सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.( As a Marathi I was also denied a house BJP leader Pankaja Munde narrated the shocking experience)

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

नमस्कार, माफ करा थोडी प्रकृती खराब आहे माझी, त्यामुळे बोलायला त्रास होतोय. त्याचबरोबर थोडी मनस्थितीही खराब आहे. सध्याची राजकीय परिस्थिती, समाजातील वातवरण इतकी सगळी समृद्धी असताना रस्ते आहेत, गाड्या आहेत. लोकांना सगळया सुविधा आहेत प्रत्येकाकडे गाड्या आहेत, हायवे आहेत, साधनं आहेत, हे सगळं असताना, कुठेतरी अस्वस्थता वाटते समाजात.

- Advertisement -

आरक्षणासासाठी भांडणं सुरू आहेत. आंदोलनं, मुंडन, हे सगळं बघून ह्रदयाला पिळ पडतो. त्याचबरोबर माणूस समाजात प्रत्येक रंगांमध्ये वाटला गेलाय. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. हे सगळं बघून असं वाटतं हे रंग जोराजोरात एकत्र करून फिरवलं, एका चक्रावर बसून तर त्यातून एक पांढरा रंग येतो. तोशांततेचा रंग आहे, हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल त्याची मी प्रतीक्षा करते.

आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय पूर्ण प्रवासात मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यानर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराची नावं ठेवावी, दुकानाचं नावं ठेवायचं यामध्ये मी कधी फार उडी घेतली नाही, परंतु एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यासोबत जो प्रकार झाला तो मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत. पकंजा मुंडे यांनी सांगितलेल्या या अनुभवानंतर आता पुन्हा एकदा मराठी माणसाचा प्रश्न मुंबईत ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: शरद पवार यांचे मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणासंदर्भात मोठे विधान, म्हणाले… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -