घरताज्या घडामोडीमराठी कलावंतांची अशी उपेक्षा योग्य नाही, आशिष शेलार यांचा थेट सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना...

मराठी कलावंतांची अशी उपेक्षा योग्य नाही, आशिष शेलार यांचा थेट सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन

Subscribe

आशिष शेलार यांनी भोईवाडा येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांशी बोलणे करुन उद्याची वेळ मिळवून दिली.

कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना काळात चित्रिकरण आणि नाट्यगृह बंद असल्यामुळे मराठी कलाकार आणि रंगकर्मी यांच्यावर आर्थिक संकट आलं आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले असून अद्यापही रंगकर्मींना दिलासा दिला नाही. मराठी कलावंतांनी ठाकरे सरकारविरोधात राज्यभर आंदोलन केलं. मुंबईमधील दादर हिंदमाता येथील हिंदमाता दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळही आंदोलन केलं होतं. यावेळी राज्य सरकारपुढे आपलं म्हणणं मांडण्यासाठी विनंती केली होती. मात्र त्यांना कोणतीही दाद मिळाली नाही अखेर भाजप नेते आशिष शेलार यांनी दखल घेऊन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन करुन वेळ मागितली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांना मराठी कलावंतांनी राज्य सरकारपुढे म्हणणं मांडण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं होते. या कलावंतांना कोणतीही दाद मिळाली नसल्याचे आशिष शेलार यांना समजले. मराठी कलावंतांनी मागण्यांसाठी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन केले. सरकारशी चर्चेची वेळ मिळावी म्हणून भोईवाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मारला, पण कोणी दाद देईनात. शेवटी आशिष शेलार यांनी भोईवाडा येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांशी बोलणे करुन उद्याची वेळ मिळवून दिली. मराठी कलावंतांची अशी उपेक्षा योग्य नाही असेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कोरोना काळात अडचणीत आलेल्या कलावंतांवर आर्थिक संकट आल्यामुळे राज्यभरात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडे व्यथा मांडण्यासाठी वेळ कलावंतांनी मागितला होता. मात्र सरकार कडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता यामुळे कलावंतांनी भोईवाडा येथे ठिय्या मांडला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनी तातडीने सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याशी फोन करुन मंगळवारी दुपारी १२.३० वाजता मंत्रालय येथे चर्चेसाठी वेळ मागितला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -