घरमहाराष्ट्रAwhad On Ajit Pawar: राज्य सहकारी बँकेत अजित पवारांनी घोटाळा केला; आव्हाडांचा...

Awhad On Ajit Pawar: राज्य सहकारी बँकेत अजित पवारांनी घोटाळा केला; आव्हाडांचा गंभीर आरोप

Subscribe

राज्य सहकारी बँकेत अजित पवारांनी घोटाळा केला आणि नाव आलं शरद पवारांवर. त्यामुळे तुम्ही दु:ख व्यक्त करत राजीनामा देण्याचं नाटक केलंत. ते कशाला करायचं होतं.

मुंबई: राज्य सहकारी बँकेत अजित पवारांनी घोटाळा केला आणि नाव आलं शरद पवारांवर. त्यामुळे तुम्ही दु:ख व्यक्त करत राजीनामा देण्याचं नाटक केलंत. ते कशाला करायचं होतं. तुम्हाला चार वेळा जे काही उपमुख्यमंत्री पद मिळालं, ते फक्त आणि फक्त शरद पवारांमुळे मिळालं, त्याची जाण ठेवा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राज्य सहकारी बँकेत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर अनेक आरोप केले आहेत. (Awhad On Ajit Pawar Ajit Pawar Scam in State Cooperative Bank A serious allegation of challenges)

असा माणूस जन्मालाच नाही…

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेत काहीतरी घोटाळे केले. त्यांनी केलेल्या घोटाळ्यांचं खापरं फुटलं ते शरद पवार यांच्यावर. त्यानंतर, अजित पवार यांनी दु:ख झालं असं भासवत, पदाचा राजीनामा देण्याचं नाटकं केलं, असं म्हणत अजित पवार यांनीच राज्य सहकारी बँकेत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला.

- Advertisement -

तुम्हाला शरद पवार यांनी चार वेळा उपमुख्यमंत्री केलं. त्याबाबात कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. परंतु तुम्ही कृतघ्न निघाले. असा कृतघ्न माणून महाराष्ट्रात जन्मलाच नाही, असं म्हणत आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

काय बा बा बा… का का का…

काय ते बा बा बा, मग का का का, काल समजावून सांगितलं की, का म्हणजे कापूस. सगळं का समजावून सांगितलं? तुमच्या 35 वर्षांच्या आयुष्यातील एक निर्णय असा सांगा की, तो महाराष्ट्राला आवडला. महाराष्ट्राने त्या निर्णयाने तुमचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. तुम्हाला 48 तास देतो. एक निर्णय सांगा. महाराष्ट्रात तुम्ही काय मोठं काम केलं ते सांगा? अर्थ नियोजन खात्यात तुम्ही काय क्रांतीकारी केलं ते सांगा? तुमच्या भागात येणारा सीएसआर फंड कोण आणतं ते सांगा? अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना सुनावलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -