घरमहाराष्ट्रमुलांना सांभाळणे, आई-वडिलांचे कर्तव्य आजी-आजोबांची 'ड्युटी' नाही !

मुलांना सांभाळणे, आई-वडिलांचे कर्तव्य आजी-आजोबांची ‘ड्युटी’ नाही !

Subscribe

पुणे – ज्येष्ठ नागरिक म्हणजे बिनकामाचे, घरातील फुलटाईम राखणदार आणि आपल्या मुलांचे बेबीसिटर ही संकल्पना बाळगणाऱ्यांची कानउघडणी करणारा एक निकाल पुणे न्यायालयाने दिला आहे. ‘मुलांना साभांळणे हे आई- वडिलांचे कर्तव्य असून ती आजी – आजोबांची ‘ड्युटी’ नाही. आजी-आजोबांवर त्यासाठी दबाव टाकता येणार नाही,’ अशा शब्दात पुण्यातील कुटुंब न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या महिलेला सुनावले.

सासू-सासऱ्यांविरोधात याचिका दाखल
एका महिलेने सासू-सासऱ्यांच्या विरोधात या संदर्भातील याचिका दाखल केली होती. सासू-सासरे मुलांचा सांभाळ करत नाहीत म्हणून तिला नाईलाजाने मुलांना पाळणाघरात ठेवावे लागतं होते. नातवंडांचा सांभाळ करणे ही सासू-सासऱ्यांची जबाबदारी आहे, अशी भूमिका तिने न्यायालयासमोर मांडली होती. न्यायालयाने मात्र तिची ही भूमिका अयोग्य ठरवली.

- Advertisement -
आजी-आजोबा मार्गदर्शक, बेबीसिटर नाही

आजी-आजोबा मार्गदर्शक, बेबीसिटर नाही’
“आपल्या लहान मुलांची काळजी घेणे ही आजी-आजोबांची नाही तर त्यांच्या पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. आजी-आजोबा तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी असतात. त्यामुळे उगाच त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत, त्यांना नातवंडांचा सांभाळ करणे प्राथमिक कर्तव्य असल्याचे सांगत दबाव आणला जाऊ शकत नाही. ते तुमच्या मुलांचे बेबीसिटर नाहीत”, असे न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले.
“जर मुलांना पाळणाघरात ठेवावे लागत असेल तर त्यासाठी आजी-आजोबांना जबाबदार धरु शकत नाही. लहान मुलांना पाळणाघरात ठेवावे लागणे यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आपली तब्बेत, इच्छा, प्लॅन यांचा विचार करता आजी-आजोबांनी बेबीसिटिंगची जबाबदारी घ्यायची की नाही याचा पूर्ण हक्क त्यांना आहे”, असे पुणे कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चौहान यांनी यावेळी सांगितले.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -