घरमहाराष्ट्रदानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल; बच्चू कडू संतापले

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल; बच्चू कडू संतापले

Subscribe

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात असल्याचे दावा केला. शिवाय, हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याचे देखील म्हणाले यावरुन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल, असा घणाघात बच्चू कडू यांनी दानवेंवर केला.

देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणे हा शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणे गरजेचे आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली. यावेळी दानवे यांच्या घरासमोर पोलीसही तैनात करण्यात आले होते.

- Advertisement -

दानवेंनी काय म्हटलं होतं?

रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना “हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवले आणि सांगितले सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावे लागेल. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -