घरदेश-विदेशभारताकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची शक्यता; पाकिस्ताननं जारी केला हाय अलर्ट

भारताकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची शक्यता; पाकिस्ताननं जारी केला हाय अलर्ट

Subscribe

लडाख आणि डोकलाममध्ये झालेला पराभव लपवण्यासाठी भारत नियंत्रण रेषेवर आणि भारत पाकिस्तान वर्किंग बाऊंड्रीवर हल्ला करण्याच्या तयारीत?

पाकिस्तान भारतावर सारख्या काही न काही कुरघोड्या करत असतो. त्यामुळे भारत देखील त्यांना तसेच चोख प्रत्युत्तर नेहमीच देत असतो. दरम्यान, पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय लष्कराकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकची भीती सतावत आहे. त्यामुळे भारताकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकने आपल्या लष्करासाठी हाय अलर्टही जारी केला आहे. यासंदर्भातील बातमी पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी जिओ न्यूजने प्रसारित केला असून याबाबतच गौप्यस्फोट केल्याची माहिती मिळतेय.

जिओ न्यूजने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असेही सांगितले, भारत पुन्हा एकदा आपल्या अंतर्गत मुद्द्यांवरुन सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानविरोधात खोटा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी माध्यमांकडून असे वृत्त प्रसारित कऱण्यात आले की, लडाख आणि डोकलाममध्ये झालेला पराभव लपवण्यासाठी भारत नियंत्रण रेषेवर आणि भारत पाकिस्तान वर्किंग बाऊंड्रीवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. या कारणामुळेच हल्ल्याच्या शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सशस्त्र दलाच्या जवानांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. यासह जिओ न्यूजने असेही म्हटले की, भारतातील अंतर्गत मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करु शकतो.

जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसवून जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानच्या लाँच पॅड्सवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी उपस्थित आहेत. तर हे दहशतवादी पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या आडून भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. परंतु भारतीय लष्कराच्या सतर्कतेने योग्य त्या कारवाईने त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देण्यात आल्याचे ही वृत्त माध्यमाद्वारे समोर आले होते.


FAKENEWS : आरोग्य मंत्रालयानेच ट्विट करून वृत्त फेटाळले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -